Join us  

हार्दिक जोशी पुन्हा रसिकांच्या भेटीला,नव्या मालिकेतून टेलिव्हिजनवर करतोय पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 11:55 AM

यापूर्वी  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे नव्या मालिकेतून अमृता पवारसह हार्दिक जोशीच्या  जोडीला रसिक किती पसंती देतात हे पाहणे रंजक असणार आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादा या भूमिकेतून हार्दिक जोशी रसिकांचा आवडता कलाकार बनला. याच मालिकेने त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. मालिका संपल्यानंतरही रसिक राणादा म्हणजेच हार्दिक जोशीला मिस करत होते. महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द हार्दिक जोशी म्हणजेच आजही चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे.

 

अभिनेता हार्दीक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि राणामुळे हार्दिकला ओळख मिळाली. त्यामुळे तो पुन्हा कधी झळकणार याकडेच चाहत्यांचेही लक्ष लागले होते. आता चाहत्यांची राणादाला भेटण्याची ईच्छाही पूर्ण होणार आहे. कारण तो लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा झळकण्यासाठी सज्ज झाला आहे, नवीन मालिका नव्या भूमिकेतून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक जोशीला पुन्हा छोट्या पाहणे रसिकही आतुर झाले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि या प्रोमोमध्ये अभिनेत्री ‘अमृता पवार’ हिला प्रेक्षकांनी पाहिलं. या मालिकेतील नायक कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. या मालिकेतील नायक दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता ‘हार्दिक जोशी’असणार आहे. ही मालिका ३० ऑगस्ट रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. 

अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारते त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे."

यापूर्वी  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे नव्या मालिकेतून अमृता पवारसह हार्दिक जोशीच्या  जोडीला रसिक किती पसंती देतात हे पाहणे रंजक असणार आहे. 

टॅग्स :हार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला