Join us  

'तुझ्या जीव रंगला' फेम अक्षया देवधरचा नवीन व्हिडीओ चर्चेत, रॉकींग अंदाज पाहून चाहते म्हणतायेत.......

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 7:00 AM

फोटोंप्रमाणे अक्षया मेजशीर व्हिडीओही शेअर करत असते. अक्षया देवधरचा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

अभिनेत्री अक्षया देवधर हिची  'तुझ्यात जीव रंगला' पहिलीच मालिका प्रचंड गाजली होती. पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना अक्षया नेहमीच सोज्वळ रुपात पाहायला मिळाली होती. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती. मालिका संपली असली तरी अक्षयावरचे रसिकांचे प्रेम अजूनही तसेच आहे. 

चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे यासाठी अक्षया देवधरही प्रचंड सक्रीय असते. विविध फोटो व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ऑफस्क्रीन ग्लॅमरस लूकची झलकही सोशल मीडिया पेजवर बघायला मिळते.अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर  शेअर केले आहेत.या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.

फोटोंप्रमाणे अक्षया मेजशीर व्हिडीओही शेअर करत असते. अक्षया देवधरचा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओत ती बुलेट चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून अक्षयाने तिच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अतिशय रॉकींग असा तिचा अंदाज पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बुलेट क्वीन म्हणत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

तसेच ज्या मालिकेमुळे अक्षयाला अमाप लोकप्रियता मिळाली त्या मालिकेला मालिकेतल्या सहकलाकारांना विसरणे अक्षयलाही शक्य नाही. म्हणूनच अधूनमधून मालिकेच्या जुन्या आठवणीतही ती रमताना दिसते. तसेच सध्या मिळालेल्या वेळत अक्षया फिटनेसकडे वळली आहे. नित्यनियमाने ती वर्कआऊट करणे योगा करताना दिसते. इतरांनाही फिट राहण्यासाठी प्रेरणा देत असते. 

टॅग्स :अक्षया देवधर