Join us  

पारंपारिक ते अधिक सुंदर!, अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 4:39 PM

अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे. तिने अनघाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अश्विनी महांगडे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचे अपडेट देत असते. नुकतेच अश्विनीने हटके फोटोशूट करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अश्विनी महांगडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, पारंपरिक ते अधिक सुंदर! 

लाल रंगाची साडीतील तिने परिधान केलेल्या पारंपारिक दागिन्यांनी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे आणि या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

या फोटोला मिळणाऱ्या प्रतिक्रियेबद्दल अश्विनी म्हणाली की, खरे तर या वेळी फोटो सगळ्यांना नेहमीप्रमाणे आवडले. पण काहींनी अर्थात माझ्या गुरूंनी दादू सर ( स्वराज्यरक्षक संभाजी आणि स्वराज्याजनांनी जिजामाता चे दिग्दर्शक विवेक देशपांडे) यांनी हे फोटो राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंगची आठवण करून देतात असे सांगितले.  तर 'आज आई कुठे काय करते' चे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनी तर बालगंधर्व यांच्या एका फोटोची आठवण झाली अशी प्रतिक्रिया दिली. मला वाटतेय या दोन्ही कमेंट्स जगात भारी आहेत. आपले काम पाहून एवढ्या मोठ्या लोकांची आठवण येणे ही आमच्या सगळ्यांच्या कामाची पावती आहे असे मला वाटते. 

ती पुढे म्हणाली की, हा फोटो प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला ८ महिन्यांचा काळ गेला. म्हणजे अनेक चर्चा झाल्या, काही रेफरन्स फोटो आम्ही पाहून त्यावर फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांनी खूप मेहनत घेतली. सांगण्याचा हेतू एवढंच की एखादी कलाकृती सत्यात उतरवण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेत असतात आणि त्यावर रसिक मायबाप आणि दिग्गज मंडळींनी कौतुक केले की कामाचे समाधान मिळते. जे आज आम्हाला मिळाले.

अश्विनी महांगडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेतील तिच्या अनघाच्या भूमिकेला खूप पसंती मिळते आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

याशिवाय अश्विनीने अस्मिता मालिकेत काम केले आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत राणू आक्काची भूमिका तिने साकारली. तिने साकारलेली ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली. अश्विनीने मराठी चित्रपटातही काम केले आहे. ती टपाल आणि बॉईज या मराठी चित्रपटात झळकली आहे.

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिकास्वराज्य रक्षक संभाजी