Join us  

सुपरस्टार जितेंद्र यांनी इंडियन आयडलच्या स्पर्धकांना दिल्या या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 6:00 AM

बॉलिवूडमधील हे सुपरस्टार नुकतेच भारतातील सर्वांत मोठ्या गाण्याच्या रिऍलिटी शो, इंडियन आयडल १० च्या मंचावर आले होते. सदैव हसतमुख असणाऱ्या जितेंद्र यांनी सेटवरील प्रत्येकासोबत खूपच छान गप्पा मारल्या.

ठळक मुद्देस्पर्धक आणि परीक्षक या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बातचीत करून खूपच खुश झाले होते.जितेंद्र यांनी उभरत्या गायकांना मनोरंजन उद्योगामध्ये कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने काही मोलाचे सल्ले देखील दिलेइंडियन आयडलच्या टॉपच्या आठ स्पर्धकांच्या लक्षणीय कामगिरीने जितेंद्र प्रचंड प्रभावित झाले होते

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सुपरस्टार होऊन गेले आहेत आणि हे सुपरस्टार्स नेहमीच अनेक लोकांना प्रेरणा देत असतात. असेच एक सुपरस्टार आहेत जितेंद्र...जितेंद्र यांनी आजवर त्यांच्या अनेक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. त्यांना त्यांचे फॅन्स प्रेमाने जम्पिंग जॅक असे देखील म्हणतात.

बॉलिवूडमधील हे सुपरस्टार नुकतेच भारतातील सर्वांत मोठ्या गाण्याच्या रिऍलिटी शो, इंडियन आयडल १० च्या मंचावर आले होते. सदैव हसतमुख असणाऱ्या जितेंद्र यांनी सेटवरील प्रत्येकासोबत खूपच छान गप्पा मारल्या. स्पर्धक आणि परीक्षक या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बातचीत करून खूपच खुश झाले होते. त्यांचा आज या वयातील उत्साह पाहून स्पर्धकांना देखील एक प्रकारची ऊर्जा मिळाली होती. जितेंद्र यांनी स्पर्धकांच्या आवाजाचे कौतुक केले. तसेच त्यांनी या उभरत्या गायकांना मनोरंजन उद्योगामध्ये कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने काही मोलाचे सल्ले देखील दिले. सगळेच स्पर्धक त्यांना भेटून खूपच खूश झाले होते.    इंडियन आयडलच्या टॉपच्या आठ स्पर्धकांच्या लक्षणीय कामगिरीने जितेंद्र प्रचंड प्रभावित झाले होते आणि त्यांनी स्पर्धकांना काही उपयुक्त गोष्टी सांगितल्या. त्यांनी स्पर्धकांना आपलं कौशल्य कायम ठेवून, नियमित रियाज करून आणखी सुधारणा करण्यास तसंच आयुष्यात सर्वच टप्प्यावर सकारात्मक राहायला सांगितलं. जितेंद्र यांनी इंडियन आयडल १० च्या सेटवर स्पर्धकांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, "या जगामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी, प्रामाणिकपणा, कष्ट आणि नशीब या गोष्टी आवश्यक आहेत. जरी दैव आणि नशीब आपल्या हातात नसले तरी प्रामाणिक आणि समर्पित राहणं आणि कष्ट करणं या गोष्टी नेहेमीच आपल्या हातात असतात आणि त्या आपण केल्या पाहिजेत. तुम्ही संपूर्ण जबाबदारीने काम करत राहिलात तर नशीब तुम्हाला संधी देऊन सहकार्य करतेच."

सुपरस्टार जितेंद्र यांना स्पर्धकांबरोबर मंचावर थिरकताना प्रेक्षकांना या शनिवारी संध्याकाळी ८ वाजता इंडियन आयडल १० मध्ये सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉलजितेंद्र