Join us

पुन्हा दिसला टीना दत्ताचा हॉट अवतार, व्हॅकेशनदरम्यानचे शेअर केले PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 13:39 IST

उतरन' मालिकेत घराघरात पोहचलेली अभिनेत्री टीना दत्ता काही दिवपांपूर्वी व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी परदेशात गेली होती. यावेळी तिने वेगवेगळ्या निसर्गरम्या ...

उतरन' मालिकेत घराघरात पोहचलेली अभिनेत्री टीना दत्ता काही दिवपांपूर्वी व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी परदेशात गेली होती. यावेळी तिने वेगवेगळ्या निसर्गरम्या स्थळांना भेट देत तेथील सौंदर्य कॅमे-याच कैद केले आहे. इतकचे नसून तिने व्हॅकेशन दरम्यान तिने काढलेले तिचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. उतरन मालिकेत देसी अंदाजात दिसणारी इच्छा ही भूमिका टीनाने साकारली होती. मालिकेतील तिचा देसी अंदाजही रसिकांना चांगलाच भावला.त्यामुळे ऑनस्क्रीन मादक अदा दाखवण्याची संधी टीनाला मिळाली नसली तरीही ऑफस्क्रीन म्हणजेच प्रत्यक्ष जीवनात मात्र हॉट आणि सेक्सी अंदाजात टीना सध्या रसिकांना घायाळ करताना दिसत आहे.फोटोत दिसणारा सेक्सी अदा आणि हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. असेच काही वेगवेगळे  फोटोही टीनाने  आपल्या फॅन्ससह शेअर केले आहेत.खरंतर टीना नेहमीच आपल्या हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिची मादक अदा आणि सेक्सी फिगर यामुळे टीनाची बरीच चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळते.खरंतय वयाच्या 5 व्या वर्षापासून टीनाने अभिनयाला सुरूवात केली आहे.सिस्टर निवेदीता मालिकेत बालकलाकार म्हणून ती झळकली होती.तसेच छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.2003 साली रितुपर्णो घोष यांचा ‘चोखेर बाली' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनसह ती झळकली होती.त्यानंतर 2005 साली 'परिणीता' सिनेमातही तिला संधी मिळाली. मालिका सिनेमा करताना तिला खरी लोकप्रियात उतरन या मालिकेमुळे मिळाली. आजही उतरन एक्ट्रेस म्हणून टीना दत्ताला ओळखले जाते.आता लवकरच टीनाच्या वाट्याल एक चांगली भूमिका आली आहे.  या मालिकेत ती एका तवायफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.या मालिकेत टीना एका बंगाली मुलीची भूमिका साकारणार असून या मालिकेचे नाव 'मीना बाजार' असे असणार आहे. वेश्यांच्या घरी जन्मलेल्या एका मुलीची कथा या मालिकेत दाखवली जाणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण कोलकता येथे होणार आहे आणि विशेष म्हणजे टीना ही मुळची कोलकताची आहे. त्यामुळे तिच्याच शहरात ती या मालिकेचे चित्रीकरण करणार आहे.या मालिकेचे अधिकाधिक चित्रीकरण कोलकाता येथे होणार असून त्यानंतर या मालिकेचा सेट मुंबईत उभारला जाणार आहे.