Join us  

​सुप्रिया पाठकला खिचडीच्या हंसामधील आवडतात या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 5:44 AM

खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे ...

खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेवर खिचडी नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता प्रेक्षकांची खिचडी ही आवडती मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस आली आहे.स्टार प्लसवर खिचडी मालिकेचे पुनरागमन झाले असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा छोट्‌या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सुप्रिया पाठक या शोमध्ये हंसाची भूमिका साकारत असून त्यांना ही व्यक्तिरेखा फार आवडते असे नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. त्या सांगतात, “हंसा ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जी कायमच सदाबहार राहील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक गोष्टींपासून अनभिज्ञ अशी ती सदैव आनंदात असते. त्यामुळे जेव्हा मला कामाचा कंटाळा येतो तेव्हा मीसुद्धा हंसासारखीच होते.”खिचडी ही मालिका २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका संपल्यानंतर २००५ मध्ये याच मालिकेची संपूर्ण टीम घेऊन निर्माते जे.डी.मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी इन्स्टंट खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली होती. आहेत. खिचडी या मालिकेत आपल्याला पारेख कुटुंबात घडत असलेली धमाल मस्ती पाहायला मिळाली होती. या कुटुंबातील हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. खिचडीचा नवा सिझन नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.   Also Read : ‘खिचडी’मध्ये अभिनेता राजेशकुमार बनला रावण!