या सुखांनो या, माझे मन तुझे झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:40 IST
या सुखांनो या, माझे मन तुझे झाले या गाजलेल्या मालिका, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे सारखी ...
या सुखांनो या, माझे मन तुझे झाले...
या सुखांनो या, माझे मन तुझे झाले या गाजलेल्या मालिका, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे सारखी नावाजलेली नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो या चित्रपटात आपण या सुंदर, सालस, मराठमोळ्या अभिनेत्रीला पाहिलं.. ती म्हणजे ऐश्वर्या नारकर. कालच ऐश्वर्या नारकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. बघूयात त्यांचे पती अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसासाठी सोमवारपासून काय काय प्लॅन्स केलेले?आजचा सोमवारचा दिवस तर माझ्यासाठी शूटिंगचा होता, पण ऐश्वर्याने संपूर्ण दिवस माझ्याबरोबर स्पेंड केला आहे. मात्र उद्या मी खास तिच्या बर्थडेसाठी शूटिंगमधून सुटी घेतली आहे. पण अनेक जणांबरोबर तिच्या बर्थडेसाठी बरीच खलबतं सुरू आहेत. तसे ए, बी, सीसारखे अनेक प्लॅन्स तयार केलेत खरं.. पण बघूयात कोणता यशस्वी होतोय? कारण तिच्या मावशीच्या बंगल्यावर.. किंवा मुंबईबाहेर कुठेतरी.. किंवा रवींद्र मंकणी यांच्या शेतावर जाऊन फॅमिलीसमवेत मजा करू, असे अनेक प्लॅन आहेत. मात्र जाण्या-येण्यातच वेळ नको जायला, काहीतरी एंजॉय करायला पण वेळ देता येणं महत्त्वाचं आहे.यावर्षीचा बाहेर कुठेतरी जायचा प्लॅन सक्सेसफुल होवो अथवा न होवो, पण मी, ऐश्वर्या आणि आमचा मुलगा अमेयच्या वाढदिवसाला घरात उपयोगी पडेल अशी एक तरी मोठी वस्तू घ्यायचं आम्ही ठरवलं आहे आणि त्यानुसार आजवर आम्ही अनेक वस्तू घेतल्या. त्याप्रमाणे यावर्षी कार घ्यायचा प्लॅन आहे.. हा प्लॅन तर नक्कीच पूर्ण होईल.तिच्या वाढदिवसाबद्दल आठवण सांगायची म्हणजे ऐश्वर्याशी ओळख झाली ते एका नाटकामध्ये काम करीत असताना. त्या नाटकाचा दौरा सुरू असतानाच तिचा वाढदिवसही होता आणि त्यावेळेला मी शरद, एकनाथ शिंदे, पणशीकर काकांनी मिळून एकदम जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा केला होता.