Join us  

हे कलाकार करणार ​नव्या वर्षाने आशा आणि उत्साहात स्वागत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 4:27 AM

नवीन वर्ष म्हणजे नवे संकल्प करण्याचा, कुटुंबातील सदस्य आणि जिवलगांसह राहण्याचा आणि पार्टी करण्याचा काळा. नवे वर्ष म्हणजे नवी ...

नवीन वर्ष म्हणजे नवे संकल्प करण्याचा, कुटुंबातील सदस्य आणि जिवलगांसह राहण्याचा आणि पार्टी करण्याचा काळा. नवे वर्ष म्हणजे नवी सुरुवात, नव्या आशा आणि सकारात्मकतादेखील. &TV चे कलाकार सांगत आहेत त्यांचे २०१८ मधील संकल्प, नव्या योजना.भाभीजी घर पर है मधील सौम्या टंडन ऊर्फ अनिता भाभी : या नवीन वर्षात मी रायपूरमध्ये राहणार्‍या माझ्या मोठ्या काकांना भेटायचे ठरवले आहे. ते ८८ वर्षांचे असून माझ्या खूप जवळचे आहेत. गेल्या १२ वर्षात मी त्यांना भेटले नाही. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना आपल्या प्रेमाची आणि आपल्याला त्यांच्या आशिर्वादाची गरज असते असे मला वाटते. ते प्रवास करू शकत नाहीत त्यामुळे आपणच त्यांना भेटायला जाऊ असे आम्ही ठरवले आहे. माझ्या नवर्‍यानेदेखील त्यांना भेटावे असे मला वाटते. ते वैज्ञानिक आहेत. माझ्या आयुष्यात त्यांच्यासारखा दयाळू माणूस मी पाहिला नाही. जेव्हा मी त्यांना भेटते तेव्हा माझ्या वडिलांना भेटल्यासारखेच मला वाटते. जसजशी वर्षे जात आहेत, तशी मला माझ्या वडिलांची जास्तच आठवण येते आहे. मी आणि माझा नवरा त्यांना भेटू, तेव्हा माझ्या वडिलांनाच भेटल्याच्या भावना असतील आणि आम्ही त्यांचे आशिर्वाद घेऊ. तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मी तिथेच स्थानिक कार्यक्रमात जाणार आहे. त्यामुळे हे वर्ष कुटुंबातील मोठ्यांचे आशिर्वाद आणि प्रेम याकरिता आहे. दरवर्षी मजा मस्ती करण्यासाठी जाते त्यापेक्षा हे वर्ष थोडे वेगळे आहे. मला आशा आहे की, २०१८ हे साल कुटुंबासाठी अधिक सुख आणि शांतता आणि चांगले आरोग्य घेऊन येईल. तसेच, मी जसे जगते त्यापेक्षा अधिक मजेने, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आयुष्य जगण्याचा आणि नव्या गोष्टी शिकण्याचा माझा नव्या वर्षाचा संकल्प आहे. मला एक गोष्ट बदलायची आहे ती म्हणजे स्वतःला अधिक प्रेरित करायचे आहे. मेरी हानिकारक बीवीमधील सुचेता खन्ना ऊर्फ पुष्पा पांडे : माझी बहीण आणि माझ्या कुटुंबासह चांगला वेळ घालवता यावा म्हणून दरवर्षी मी माझ्या मूळ गावी, पुण्याला जाते. शिवाय माझा लहानपणीपासूनचा मित्रपरिवार तिथे आहे. मला अतिशय शांतपणे सण साजरे करायला आवडतात आणि त्यामुळे मी इंप्रेस गार्डनमध्ये आल्हाददायक वातावरणात सकाळी वॉक घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करेन. यावर्षी मी माझ्या आयुष्यात ‘नाही’ म्हणायला शिकायचे, ही एक गोष्ट स्वतःमध्ये बाणवणार आहे. लोकांना नाही म्हणायला मला खूप वेळ लागतो पण मला आता खरेच यावर काम करावे लागेल. भाभाजी घर पर है मधील रोहिताश गौड ऊर्फ तिवारीजी : येत्या वर्षात मी फिट राहून माझ्या आरोग्याची योग्य काळजी घेणार आहे. याशिवाय मी मोठ्या घरात शिफ्ट होण्याची योजना आखत आहे आणि यावर्षी मी हे नक्कीच करणार आहे. माझी मालिका भाभीजी घर पर है बरोबरच अन्य काही नव्या गोष्टींचा वेध घेण्याचाही मी प्रयत्न करणार आहे. अग्निफेरामधील ज्योत्स्ना चांदोला ऊर्फ रज्जो : मी अजूनपर्यंत काहीही ठरवलेले नाही पण मला खात्री आहे की, माझा नवरा नितेश आणि आमच्या मित्रपरिवारासह मी गोव्याला जाईन. कमी भावनात्मक राहून गोष्टी थोड्या अधिक प्रौढतेने हाताळायच्या असा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. शिवाय मला नव्या देशांमध्ये जाऊन त्यांचे रितीरिवाज जाणून घ्यायचे आहेत. मला आशा आहे की, हे नवे वर्ष भरपूर प्रवासाचे आणि समृद्ध अनुभवांचे असेल. हाफ मॅरेजमधील प्रियांका पुरोहीत ऊर्फ चांदनी :  आम्हाला शूटमधून आठवड्याची सुट्टी असल्यामुळे मी गोव्यातच आहे. इथेच माझ्या कुटुंबासह नव्या वर्षाचे स्वागत मी करणार आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा माझ्या मित्रपरिवारासह नव्या जागा शोधत प्रवास करण्याचा माझा नव्या वर्षाचा संकल्प आहे. अग्निफेरामधील अंकीत गेरा ऊर्फ अनुराग: माझ्या लहानपणीच्या मित्रांबरोबर मी नेहमीच गोव्यात नवे वर्ष साजरे करतो. आम्ही कोणत्याही देशात असलो, काहीही झाले तरीही प्रत्येक नव्या वर्षी एकत्र राहायचे आम्ही ठरवले आहे. नवे वर्ष एकत्रित साजरे करू याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. जास्त झोप काढावी हा माझा नव्या वर्षाचा संकल्प आहे. कामाच्या वेळांमुळे गेल्या वर्षात माझ्या शरीराला मी योग्य आराम दिला नाही हे मला कळले आहे. आता मी लवकर झोपणार असून माझ्या आरोग्याची काळजी घेईन. मला प्रवास खूप आवडत असल्यामुळे यावर्षी प्रवासाचादेखील मी प्रयत्न करणार आहे, पण माझ्या शूटच्या व्यस्ततेमुळे यावर्षी जास्त वेळ मिळाला नाही.