Join us  

९०च्या दशकातील हे लोकप्रिय बालकलाकार आता दिसतात असे, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:00 AM

नव्वदच्या दशकात लहान मुलांसाठी बऱ्याच मालिका प्रसारीत होत होत्या. या मालिकांनी बच्चे कंपनीच्या मनावर अधिराज्य गाजवले होते

नव्वदच्या दशकात लहान मुलांसाठी बऱ्याच मालिका प्रसारीत होत होत्या. या मालिकांनी बच्चे कंपनीच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या मालिका आजही ज्यांनी पाहिल्या होत्या त्यांच्या लक्षात आहेत. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले बालकलाकार आता मोठे झाले आहेत. त्यातील काही जण आजही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत तर काही वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. जाणून घेऊयात कोण आहेत, हे कलाकार

तन्वी हेगडे

छोट्या पडद्यावर परीकथेवर आधारीत असलेली नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मालिका म्हणजे सोनपरी. या मालिकेत परीची भूमिका मृणाल कुलकर्णीने साकारली होती आणि फ्रुटीची भूमिका साकारली होती बालकलाकार तन्वी हेगडे हिने. तन्वी आता मोठी झाली असून तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे. 

अविनाश मुखर्जी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बालिका वधू जगदीश उर्फ जग्याची भूमिका अविनाश मुखर्जीने साकारली होती. आजही तो प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.

जनक शुक्ला

करीश्मा का करीश्मा मालिका २००३ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका अमेरिकन टीव्ही सीरिज स्मॉल वंडरची हिंदी रिमेक होता. या मालिकेत रोबोची भूमिका जनक शुक्लाने साकारली होती.

निशांत मेहरा 

नव्वदच्या दशकात फक्त मालिकाच नाही तर जाहिरातीदेखील लोकप्रिय होत्या. या जाहिराती आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. सनड्रॉप तेलाची जाहिरात तुम्हाला आठवत असेल ना. लहान मुलगा पदार्थामधून उड्या मारताना दिसल्या होत्या.

किंशुक वैद्य

जादूची पेन्सिलवर आधारीत मालिका शाकालाका बूम बूम त्यावेळी खूप लोकप्रिय होती. या मालिकेत संजू व त्याची जादूची पेन्सिल बच्चेकंपनीमध्ये खूप हिट झाली होती. संजूची भूमिका साकारणारा अभिनेता किंशुक वैद्य आता मोठा झाला आहे आणि तो सध्या हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसतो आहे. 

परजान दस्तूर

परजान दस्तूर धारा तेलाच्या जाहिरातीतून घराघरात पोहचला. तसेच कुछ कुछ होता है या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. या चित्रपटानंतरही तो बऱ्याच हिंदी चित्रपटात झळकला आहे.

तेजन दिवानजी

. ‘ओ हो हो स्कुल टाईम, ऍक्शनचा स्कुल टाईम, क्लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट अँड लेक्चर. गुड …गुड मॉर्निग टीचर.’ हे गाणं ऐकूनच तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. कुरळ्या केसाचा मुलगा आपल्याला जाहिरातीत त्याचे चकचकणारे शूज दाखवायचा आणि आपणही आई वडिलांकडे तसेच शूज हवे असल्याचा हट्ट करत होतो. हा मुलगा आता मोठा झाला असून त्याचे नाव आहे तेजन दिवानजी. तेजनने त्यावेळी फक्त स्कुल टाईम शूजचीच जाहिरात केली नव्हती, तर तो मॅगी आणि बॅन्डेजच्या जाहिरातीत सुद्धा दिसला. हेच नाही तर तो पहिला नशाच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये दिसला होता. मात्र आता तो सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाही. आता तो एमडी असून कॅन्सरवर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या रेडिएशन उपचारांचा तज्ज्ञ आहे. तो रेडिएशन ऑन्कोलॉजीचे स्पेशालिस्ट आणि कॅन्सरवर उपचार करतो.