Join us  

अमेरिकेत सेटल व्हायचा प्रश्नच नाहीये ः मृणाल दुसानीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 11:56 AM

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या कथानकाला नुकतेच वळण मिळाले आहे. या मालिकेत यशचा मृत्यू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले ...

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या कथानकाला नुकतेच वळण मिळाले आहे. या मालिकेत यशचा मृत्यू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. या मालिकेच्या या नव्या ट्विस्टबाबत आणि मृणाल दुसानीसच्या एकंदर करियरविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत यशच्या मृत्युनंतर प्रेक्षकांना आता काय पाहायला मिळणार आहे?यशच्या मृत्युनंतर जुई मानसिकरित्या कमकूवत झाली आहे. पण त्यातही ती यशच्या कुटुंबियांना सांभाळणार आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ती उचलणार आहे. तसेच पुन्हा कामाला जाऊन नवीन प्रोजेक्ट ती हातात घेणार आहे.या मालिकेद्वारे तुम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच्याविषयी काय सांगशील?देहदान हे सगळ्यांनी करणे अतिशय गरजेचे आहे. देहदान केल्यास आपल्या मृत्युनंतरही आपण एखाद्याला आयुष्य देऊ शकतो. त्यामुळे यशचे अंतिम संस्कार न करता त्याचे देहदान केले असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. तसेच यशच्या मृत्युनंतरही जुई गळ्यातले मंगळसूत्र काढणार नाहीये. आपल्या समाजात अनेक वर्षं जुन्या परंपरा, रुढी आपल्याला पाहायला मिळतात. पतीच्या मृत्युनंतर पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र हे काढलेच जाते. पण यशची आठवण म्हणून जुई मंगळसूत्र तसेच ठेवणार आहे. आज शहरांमध्ये पतीच्या मृत्युनंतर देखील अनेक स्त्रिया मंगळसूत्र तशाच ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. पण गावाकडच्या लोकांना विधवेने मंगळसूत्र घालणे हे आजही पटत नाही. त्यामुळे या मालिकेद्वारे एक सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.तुझ्या खऱ्या सासरविषयी काय सांगशील?आजपर्यंत मी मालिका-चित्रपटांमध्ये जवळजवळ सहा-सात लग्न केली आहेत. त्यामुळे मी आता लग्न लावूही शकते असे मी अनेकवेळा मस्करीत म्हणते. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा क्षण हा खूपच अविस्मरणीय असतो. मी आज मालिकेत आदर्श सूनेची व्यक्तिरेखा साकारत असली तरी खऱ्या आयुष्यात मला आदर्श सून होण्याची आजही संधी मिळालेली नाहीये. माझे पती बाहेरगावी राहात असल्याने मी त्यांना खूपच कमी वेळ देते. मी नुकतीच नीरजला भेटायला अमेरिकेला गेले होते. तिथे आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. आमचे अरेंज्ड मॅरेज असल्याने आम्ही सध्या तरी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अमेरिकेत त्याच्यासोबत घालवलेला वेळ हा माझ्यासाठी खूपच खास होता.या मालिकेनंतर अमेरिकेत सेटल व्हायचा तुझा काही विचार आहे का?मी सध्या मालिकेत व्यग्र असल्याने नीरजला वेळ देऊ शकत नाहीये. पण ही मालिका संपल्यानंतर मी काही काळासाठी तरी अमेरिकेला जाणार आहे आणि त्याच्यासोबत खूप सारा वेळ घालवणार आहे. त्या ब्रेकमध्ये मला देखील चांगले फ्रेश होता येईल. तो केवळ एक-दोन वर्षांसाठी अमेरिकेला गेला आहे. त्याचे काम संपल्यावर तो भारतात परतणार आहे. त्यामुळे अमेरिकेत सेटल व्हायचा प्रश्नच नाहीये. तू आणि संतोष जुवेकर या मालिकेत सुरुवातीपासून काम करत होता. आता तू संतोषला मालिकेच्या सेटवर किती मिस करत आहेस?यशचा मृत्यू झाला, त्यावेळेच्या दृश्याचे चित्रीकरण करताना मला खरेच रडू आले होते. संतोषला त्या प्रकारे पाहण्याचा मी कधी विचारही करू शकत नाही. यशचा मालिकेत मृत्यू दाखवल्यावर प्रेक्षकांना जितका धक्का बसला, तितकाच आमच्या टीमला देखील बसला होता. कारण आम्हाला कोणालाच याची कल्पना नव्हती. आम्हाला सगळ्यांनाच चित्रीकरण करताना संतोषची अनुपस्थिती जाणवत आहे. Must Read : संतोष जुवेकर घेणार अस्सं सासर सुरेख बाईमधून एक्झिट