Join us  

TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 2:47 PM

TRP : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.

मालिकांचा टीआरपी (TRP) हा सर्वस्वी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावर अवलंबून असतो. ज्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो त्या मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवताना दिसतात. मागील काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील मालिका याबाबतीत अव्वल ठरलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे स्थान आता स्टार प्रवाह वाहिनीने निश्चित केलेले पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप दहाच्या यादीत नाव कमावताना दिसत आहेत. या आठवड्यात सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेने अव्वल स्थान पटकावलेले पाहायला मिळत आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर होती. मात्र आता टीआरपीच्या शर्यतीत 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेला ६.८ रेटिंग मिळाले आहे. तर 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ६.६ रेटिंग मिळाले आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला ६.२ रेटिंग मिळाले आहे.  'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandh Maticha) मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ६.१ रेटिंग मिळाले आहे. पाचव्या क्रमांकावर 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका आहे. टीआरपीनुसार या मालिकेला ५.९ रेटिंग मिळाले आहे.

'रंग माझा वेगळा' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ५.७ रेटिंग मिळाले आहे. टीआरपीच्या शर्यतीत 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या स्थानावर आहे. या मालिकेला ५.६ रेटिंग मिळाले आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ५.३ रेटिंग मिळाले आहे. नवव्या क्रमांकावर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका आहे. या मालिकेला ४.९ रेटिंग मिळाले आहे. 'स्वाभीमान' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ४.४ रेटिंग मिळाले आहे. 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :टीआरपीआई कुठे काय करते मालिका