Join us  

सहकुटुंब सहपरिवार मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:17 PM

आता लवकरच या मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार (Sahakutumb Sahapariwar). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर हे कलाकार यात मुख्य भूमिका साकारत आहेत. आता लवकरच या मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे.

मराठीसिरिअल्स ऑफिशलच्या रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायकोमधील राधिकाची मैत्रिण रेवती म्हणजेच अभिनेत्री श्वोता मेहंदळेची मालिकेत एंट्री होणार आहे. आता श्वेता मालिकेत कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र नेटकरी श्वेता अंजीच्या बहिणीची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज वर्तवत आहेत.

श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते. या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे.

'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह