Join us  

छोट्या पडद्यावरील ही जोडी लवकरच होणार विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 5:21 PM

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील जोड्यांपैकी एक जोडी आहे. परंतु लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे समजते आहे.

ठळक मुद्दे लग्नाच्या सात वर्षांनंतर राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांच्या नात्यात आला दुरावा ‘मर्यादा लेकिन कब तक’ या मालिकेच्या सेटवर झाली होती राकेश बापट आणि रिद्धी डोगराची ओळख

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील जोड्यांपैकी एक जोडी आहे. परंतु लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे समजते आहे. या दोघांमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. या दोघांना आता एकत्र राहायचे नसून रिद्धीला राकेशपासून दूर राहायचे आहे. एवढेच नाही तर दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांची ओळख स्टार प्लस वाहिनीवरील ‘मर्यादा लेकिन कब तक’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रिद्धी आणि राकेशने दिलेल्या अधिकृत विधानानुसार हो आम्ही वेगळे राहत आहोत. हा निर्णय आम्ही एकमेकांसाठी, कुटुंब व स्वतःच्या सन्मान व विचारपूर्वक केला आहे. आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. आता आम्ही कपल म्हणून नाही राहू शकत. आमची मैत्री पूर्वीसारखी कायम राहणार आहे.

आशा नेगी ही रिद्धीची जवळची मैत्रीण आहे. रिद्धी आणि राकेश यांच्यामधील तणावावर काहीही बोलण्यास नकार दिला. मी रिद्धीची मैत्रीण आहे. मला सगळे माहित आहे, पण मी याबाबत काहीही बोलणार नाही, असे ती म्हणाली. याशिवाय रिद्धीची आणखी एक मैत्रीण सरगुन मेहतानेने यासंदर्भात भाष्य करणे टाळले. दुसरीकडे रिद्धी डोगरानेही हे वृत्त फेटाळत, या सगळय़ा बातम्या चुकीच्या असल्याचे तिने सांगितले. तर राकेशने अद्याप याबाबत काहीही भाष्य केलेले नाही.

रिद्धी डोगरा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने ‘वो अपना सा’, ‘मर्यादा’ आणि ‘लागी तुझसे लगन’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तर राकेश बापटने कुबूल है, मर्यादा आणि बहू हमारी रजनीकांत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले असून ‘तुम बिन’ या चित्रपटातही तो झळकला होता. याशिवाय त्याने सविता दामोदर परांजपे, सर्व मंगल सावधन, वृंदावन या मराठी चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

टॅग्स :राकेश बापटरिद्धी डोगरा