Join us  

‘कर्णसंगिनी’साठी तेजस्वी प्रकाश शिकतेय रथ चालवायला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 2:52 PM

‘कर्णसंगिनी’ या मालिकेत तेजस्वी प्रकाश निव्वळ एक नाजूक राजकन्या नसून युद्ध कला जाणणाऱ्या आणि न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवणाऱ्या राजकन्येची भूमिका साकारत आहे.

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कर्ण, उरुवी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. 

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील कर्णसंगिनी ही मालिका कविता काणे यांची प्रसिद्ध कादंबरी कर्णाज वाईफः द आऊटकास्ट क्वीनवर बेतलेली आहे. कधीही सांगण्यात न आलेल्या कर्ण आणि त्याची जोडीदार उरुवीच्या या कथेमधून सर्व सामाजिक आणि वर्गांच्या मर्यादा लांघणारी प्रेमकथा पाहायला मिळेल. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले, किंशुक वैद्य, अशीम गुलाटी यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘कर्णसंगिनी’ या मालिकेत राजकन्या उरुवीची भूमिका तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री रंगवत आहे. एखाद्या पौराणिक मालिकेत ती प्रथमच भूमिका साकारत असून तिला या अगदी नव्या क्षेत्रातील भूमिका रंगविताना पाहण्याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागली आहे. ती निव्वळ एक नाजूक राजकन्या नसून ती युद्ध कला जाणणारी आणि न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवणारी राजकन्या आहे. तिने आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांमध्ये तिला अभिनयाची मनापासून आवड असल्याचे दिसून येते. टीव्हीवर घोडेस्वारी करणारी ती पहिली अभिनेत्री ठरेल. इतकेच नव्हे तर या मालिकेसाठी ती रथ चालविण्यासही शिकली आहे. याविषयी तेजस्वी सांगते, “मी माझ्या पूर्वीच्या एका मालिकेतील भूमिकेसाठी घोडेस्वारी शिकले होते, पण ‘कर्णसंगिनी’ या मालिकेसाठी मी प्रथमच रथ चालविण्यास शिकले आहे. रथ चालविण्यासाठी बरीच मेहनत आणि कौशल्याची गरज असते, पण मला हे शिकताना मजा येत आहे.”

चार घोड्यांचा भव्य रथ लीलया हाकताना तेजस्वीला पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक आल्हददायक अनुभव ठरणार आहे. यातील सर्व स्टंट प्रसंग आणि अभिनय करताना ही गुणी अभिनेत्री प्रेक्षकांना आपल्या अभिनयगुणांनी मोहवून टाकील.

‘कर्णसंगिनी’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.00 वाजता ‘स्टार प्लस’वर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :कर्णसंगिनीतेजस्वी प्रकाश