Join us  

अग्गंबाई ‘सूनबाई’चं फेसबुक अकाऊंट पुन्हा हॅक, तेजश्री प्रधानची ट्विटरद्वारे माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:21 PM

गेल्या काही दिवसांत अकाऊंट हॅकिंगच्या घटना वाढल्या असून तेजश्रीप्रमाणे अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अशा हॅकर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी होते आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्री सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

 फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र नुकताच तेजश्रीला धक्का बसला आहे. तेजश्रीचं अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. स्वतः तेजश्रीने ट्विटरवरुन याबाबतची माहिती रसिकांना आणि तिच्या चाहत्यांना दिली आहे. 

“निळी खूण असलेलं माझं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालं आहे. या अकाऊंटद्वारे काही पोस्ट करण्यात आले असेल तर ते मी केलेलं नाही. संबंधित हॅकरविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे” अशी पोस्ट तेजश्रीने केली आहे. गेल्या काही दिवसांत अकाऊंट हॅकिंगच्या घटना वाढल्या असून तेजश्रीप्रमाणे अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अशा हॅकर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी होते आहे. 

मोठ्या ब्रेकनंतर तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर पुनरागमन 

तेजश्री प्रधान 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याबद्दल तेजश्री म्हणाली, "एक काळ असा होता जेव्हा मी नाटक, मालिका आणि चित्रपट एकत्र करत होती. माझ्या अनेक चाहत्यांना मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायचं होतं आणि त्यांनी तशी इच्छा देखील माझ्याकडे व्यक्त केली. चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळले असं मी म्हणेन.

टॅग्स :तेजश्री प्रधान