Join us  

मेरे साईमधील तोरल रासपुत्रला या गोष्टीत आहे रस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 3:35 PM

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना मेरे साई ही मालिका पाहायला मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत अभिनेत्री तोरल रासपुत्र बाईजाची भूमिका साकारत आहे.

आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपल्याला बऱ्याच वेळा आपले छंद जोपासता येत नाहीत. मालिकेत काम करणारे कलाकार तर कित्येक तास चित्रीकरण करत असतात. त्यामुळे त्यांना तर आपल्या छंदासाठी वेळ देताच येत नाही. पण त्यातही काही कलाकार वेळात वेळ काढून आपले छंद जोपासतात. काही कलाकार तर चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणारा वेळ वाया न घालवता तो वेळ आपला छंद पूर्ण करण्यासाठी वापरतात.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना मेरे साई ही मालिका पाहायला मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत अभिनेत्री तोरल रासपुत्र बाईजाची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या सेटवर तिने तिचे शिवणकाम कौशल्य नुकतेच सगळ्यांना दाखवले. या मालिकेच्या एका दृश्यानुसार गणपतरावचे म्हणजेच सिद्धार्थ कर्णिकचे नाटकासाठी वापरायचे कपडे खराब होतात. नाटकसाठी नवीन कपडे कसे शिवावे याबद्दल गणपतराव चांगलेच टेन्शनमध्ये येतात. कपडे बनवण्यासाठी ते गावातील मुलांची मदत घेण्याचे ठरवतात. त्यामुळे ही मुले नवीन कपडे शिवण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्यासोबत गावातील सर्व स्त्रिया देखील एकत्र येऊन गणपतरावांना मदत करण्याचे ठरवतात. बायजी देखील गणपतराव यांना मदत करायला येतात आणि त्या साडीवर नक्षीकाम करतात. या मालिकेचे चित्रीकरणात करण्यात तोरल इतकी गुंतून गेली होती की, दृश्याचे चित्रीकरण झाल्यानंतर देखील ती नक्षीकाम करण्यातच व्यग्र होती. तिने साडीवर इतके सुंदर नक्षीकाम केले होते की तिच्या या कौशल्यावर सगळेच फिदा झाले. 

याविषयी तोरल रासपुत्र सांगते, "जेव्हा मी शाळेत होते तेव्हा शिवणकाम हे माझे आवडते काम होते. पण नंतरच्या काळात मी माझ्या अभ्यासात आणि माझ्या अभिनय करियरमध्ये प्रचंड व्यग्र झाले. त्यामुळे मला शिवणकामासाठी कधी वेळच देता आला नाही. शिवणकाम मला प्रचंड आवडत असल्याने मेरे साई या मालिकेच्या या विशिष्ट दृश्याचे चित्रीकरण करायला मला खूप मजा आली. दृश्याचे चित्रीकरण संपले असले तरी मी साडीवरील नक्षीकाम पूर्ण केले. या दृश्याचे चित्रीकरण करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. 

टॅग्स :मेरे साई मालिका