Join us  

तारक मेहताच्या सेटवरील या खास सिक्रेटविषयी अनेक वर्षांनंतर सांगितले जेठालालने, वाचा काय आहे हे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:45 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवरची एक खास गोष्ट जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीने सांगितली आहे.

ठळक मुद्देदिलीप जोशीने सांगितले होते की, पॅकअप असे दिग्दर्शकाने सांगताच या मालिकेत भिडेच्या भूमिकेत असलेला मंदार चांदवलकर सगळ्यात पहिल्यांदा घरी जातो. आम्ही मेकअप रूमपर्यंत पोहोचेपर्यंत मंदार त्याची बॅग घेऊन घरी जायला निघालेला असतो.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत जेठालालच्या भूमिकेत आपल्याला दिलीप जोशीला पाहायला मिळत आहे. दिलीपने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता ही या मालिकेमुळे मिळाली.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं लोकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील सहकलाकार हे एखाद्या कुटुंबियांप्रमाणे राहात असून एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होतात. त्या सगळ्यांमध्ये खूपच चांगले नाते आहे. मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना ते एकमेकांसोबत खूप मजा मस्ती करतात. 

सध्या लॉकडाऊन असल्याने कोणत्याही मालिकांचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना तारक मेहता का उल्टा चष्मा ही त्यांची आवडती मालिका पाहाता येत नाहीये. सध्या दिलीप जोशीची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत पॅकअपची घोषणा झाल्यानंतर कोणता कलाकार सगळ्यात पहिल्यांदा घरी पळतो याविषयी त्याने सांगितले होते. काही वर्षांपूर्वी दिलीपने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, पॅकअप असे दिग्दर्शकाने सांगताच या मालिकेत भिडेच्या भूमिकेत असलेला मंदार चांदवलकर सगळ्यात पहिल्यांदा घरी जातो. आम्ही मेकअप रूमपर्यंत पोहोचेपर्यंत मंदार त्याची बॅग घेऊन घरी जायला निघालेला असतो. त्यामुळे सगळ्यात लवकर घर जाणारी व्यक्ती कोण अशी स्पर्धा आमच्या सेटवर ठेवली तर मंदार नक्कीच विजेता ठरेल असे मी अनेकवेळा मस्करीत म्हणतो. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा