Join us  

तारक मेहता का उल्टा चश्मा v/s गोकुळधामची दुनियादारी, हिंदी की मराठी कोणतं व्हर्जन आहे चांगलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:07 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका आता मराठीतही दाखल झाली आहे.

सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चित्रपटातील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. हॅप्पी गो लकी स्टोरीलाइन असलेली ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. प्रेक्षक उत्सुकतेनं आगामी भागांची वाट पाहत असतात. इतकंच नाही तर प्रसारीत झालेले एपिसोड्स पुन्हा पुन्हा पाहत असतात.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत विनोदाच्या मेजवानीसोबतच चांगला मेसेजही प्रेक्षकांना दिला जातो. या मालिकेतील कलाकारांसोबतच दिग्दर्शनही खूप चांगले असते. प्रत्येक पात्रांचं वेगळे वैशिष्ट्ये आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका आता मराठीतही दाखल झाली आहे. या शोचं नाव आहे गोकुळधामची दुनियादारी.

यापूर्वी तेलगूमध्येदेखील ही मालिका प्रसारीत करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या तारक मामा अय्यो रामा असं तेलगूमधील मालिकेचे नाव असून आतापर्यंत 600हून अधिक भाग प्रसारीत झाले आहेत. 

तारक मेहता का उल्टा चश्माचं मराठीतील व्हर्जन गोकुळधाम दुनियादारी फक्त मराठी वाहिनीवर 24 डिसेंबर, 2019 ला दाखल झाली आहे.  हिंदी शो मराठीत डब करण्यात आला आहे. डबिंग आणि मराठी डायलॉग चांगले झाले आहेत. तीच मजा मराठीत देखील मिळत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

तुम्हाला कसा वाटतोय मराठीतील तारक मेहता का उल्टा चश्मा कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

 

 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा