Join us  

दयाबेनची होणार धमाकेदार वापसी! ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांनो, बस और थोडा इंतजार...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 10:32 AM

टीव्हीचा सर्वाधिक लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ठळक मुद्देशोमध्ये दयाबेन परतलीच तर गोकुलधामसोबतच प्रेक्षकांसाठीही हा आनंदाचा क्षण असेल

टीव्हीचा सर्वाधिक लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  प्रेक्षकांना एक सुपर सरप्राईज देण्याची तयारी शोच्या मेकर्सनी सुरु केली आहे. ही बातमी काय तर दयाबेन अर्थात दिशा वकानीची वापसी. सुमारे तीन वर्षांपासून दयाबेन शोमधून गायब आहे. खरे तर ती शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्यात. पण आता पक्की खबर आहे. लॉकडाऊननंतर दयाबेन गोकुलधाममध्ये परतणार असे कळतेय.

पुढील महिन्यात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या खास क्षणासाठी मेकर्स फॅन्ससाठी एक खास सरप्राईज प्लान करत आहेत. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी नुकतेच याबाबतचे संकेत दिले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या काही निर्देशांनुसार शोचे शूटींग होणार पुन्हा सुरु होत आहे. अशात दयाबेनला शोमध्ये परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तिच्याशी संपर्क केला गेला आहे.

शोमध्ये दयाबेन परतलीच तर गोकुलधामसोबतच प्रेक्षकांसाठीही हा आनंदाचा क्षण असेल. कारण चाहते अनेक दिवसांपासून दयाबेनच्या परतीकडे डोळे लावून बसले आहेत.तुम्हाला ठाऊक आहेच की, दिशा  प्रेग्नंसीकाळातच शोमधून बाहेर पडली होती. बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी दिशा शोमध्ये परतणार होती. मात्र यादरम्यान तिने मेकर्ससमोर काही अटी ठेवल्याची चर्चा रंगली होती. या अटी निर्मात्यांनी अमान्य केल्याचेही मानले गेले होते. दिशाने काम करू नये, अशी तिचा पती मयूर पांडेची इच्छा असल्याचीही चर्चा होती. दिशा शोमध्ये नसल्याने प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली होती.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी