Join us  

कवी कुमार आझाद यांच्या निधनाला झाले वर्षं, त्यांची ही इच्छा कायम राहिली अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 4:28 PM

कवी कुमार आझाद यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या निधनाने त्यांची एक इच्छा अपुरी राहिली होती. 

ठळक मुद्देकवी कुमार आझाद यांना एक भोजपुरी चित्रपट बनवण्याची इच्छा होती. त्यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली होती आणि लवकरच त्यावर काम करायला ते सुरुवात करणार होते. पण त्यांच्या निधनामुळे ही इच्छा अपुरी राहिली.

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे निधन 9 जुलै 2018 ला झाले होते. त्यांच्या निधनाला आज वर्षं झाले असून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. या मालिकेत त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच कोमल हाथीच्या भूमिकेत असलेल्या अंबिका रंजनकर यांनी कवी कुमार आझाद यांच्यासोबतचे चित्रीकरणाचे काही फोटो फेसबुकला पोस्ट केले आहेत.

कवी कुमार आझाद यांच्या निधनामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला होता. आता या मालिकेत त्यांची जागा निर्मल सोनीने घेतली आहे. कवी कुमार आझाद यांची तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी 9 जुलै 2018 ला जाऊ शकणार नाहीत असा त्यांनी सेटवर निरोप कळवला होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले होते. 

कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले आहे. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. त्यांच्या कवितांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले होते. कवी कुमार आझाद यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या निधनाने त्यांची एक इच्छा अपुरी राहिली होती. 

कवी कुमार आझाद यांना एक भोजपुरी चित्रपट बनवण्याची इच्छा होती. त्यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली होती आणि लवकरच त्यावर काम करायला ते सुरुवात करणार होते. पण त्यांच्या निधनामुळे ही इच्छा अपुरी राहिली. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माकवी कुमार आझाद