Join us

'स्वरागिनी' फेम वरूण कपूर ‘सावित्री देवी कॉलेज और हॉस्पिटल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 15:25 IST

'स्वरागिनी' फेम रूण कपूर लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.‘सावित्री देवी कॉलेज और हॉस्पिटल’ या मालिकेतून तो पुन्हा एकदा ...

'स्वरागिनी' फेम रूण कपूर लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.‘सावित्री देवी कॉलेज और हॉस्पिटल’ या मालिकेतून तो पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.या मालिकेची कथा हॉस्पिटलच्या अवतीभोवती फिरणारी असून मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत वरूण झळकणार आहे.स्वरागिणी मालिके नंतर वरूणने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत आपला संपूर्ण वेळ त्याच्या कुटुंबियांना दिला होता.गेल्या दोन महिन्यात तो त्याच्या पत्नीसह परदेशात व्हॅकेशनही एन्जॉय करायला गेला होता. त्यामुळे आता वरूण संपूर्ण उत्साहासह पुन्हा एकदा अभिनय करताना झळकणार आहे. याविषयी तो सांगतो, मुळात अभिय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतला होता. मोठ्या ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा शूटिंगमध्ये रमणार असल्यामुळे एक वेगळाच आनंद वाटतोय.नवीन मालिका नवे मित्रमंडळी भेटतली.त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.या मालिकेत वरूण एका मेडिकल इंटर्नच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वीही हॉस्पिटवर आधारित ‘संजीविनी’, ‘एक नयी उम्मीद रौशनी’आणि‘दिल मिल गए’ मालिका रसिकांच्या भेटीला येऊन गेल्या आहेत.त्यामुळे ही मालिका कितपत स्वत:चे वेगळेपण सिध्द करण्यासाठी सध्या मालिकेची टीम खूप मेहनत घेत आहे. या मालिकेत वरूण शर्मासह मोहन कपूर, शिल्पा शिरोडकर,नेहा बग्गा, शरण कौर आणि किश्वर मर्चंटही झळकणार आहेत.