स्वप्निल जोशीने बदलले नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 09:36 IST
नावात काय आहे असे जरी म्हटले जात असले तरी एखाद्या सेलिब्रिटीच्या नावात बरच काही ...
स्वप्निल जोशीने बदलले नाव
नावात काय आहे असे जरी म्हटले जात असले तरी एखाद्या सेलिब्रिटीच्या नावात बरच काही असत हे खरय. कोणत्याही नायक किंवा नायिकेची ओळख ही त्यांच्या नावातच दडलेली असते. मग अशावेळी जर त्या हिरोचे नाव चुकले किंवा बदलले तर गोंधळ होऊ शकतो. परंतू स्वप्निल जोशीने मात्र त्याच्या नावाचे स्पेलिंगच बदलले आहे. टष्ट्वीटरवर स्वप्निलच्या नावात तुम्हाला दोन डब्ल्यु पहायला मिळतील. आता त्याने असे का केले, हा प्रश्न त्याच्या फॅन्सला नक्कीच पडला असेल. यासंदर्भात सीएनएक्स ने स्वप्निलला विचारले असता तो म्हणाला, स्वप्निल जोशी या नावाने आॅलरेडी सर्व सोशल वेबसाईटवर आयडीज असल्याने मला माझ्या नावात एक डब्ल्यु एक्स्ट्रॉ टाकावा लागला. एवढेच नाही तर मी खरा स्वप्निल जोशी आहे का हे पाहण्यासाठी टष्ट्वीटरने मला व्हेरीफाय देखील केले. हे कोणत्याही प्रकारच्या अंकशास्त्रामुळे मी केले नाही तर मला ते करावे लागले असल्याचे तो सांगतोय.