Join us

स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत क्रांती प्रकाश झा साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 11:54 IST

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात झळकलेला क्रांती प्रकाश झा प्रेक्षकांना लवकरच स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत ...

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात झळकलेला क्रांती प्रकाश झा प्रेक्षकांना लवकरच स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो स्वामी रामदेव यांची प्रमुख भूमिका साकारणार असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांना डिस्कव्हरी जीत या वाहिनीवर पाहाता येणार आहे. क्रांती प्रकाश झा दिसायला अगदी रामदेव बाबांसारखा असून तो त्यांच्याप्रमाणेच योगासने देखील अगदी सहजपणे करू शकतो. त्यामुळेच या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत रामदेव बाबांचा सर्वसामान्य मुलगा ते जागतिक आयकॉन असा दीर्घ प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण करत आहे. रामदेवः एक संघर्ष या मालिकेसाठी क्रांती प्रकाश झाची निवड करण्याबाबत अजय सांगतो, आम्हाला या मालिकेसाठी स्वामी रामदेव यांच्यासारखा दिसणारा आणि त्यांच्यासारखे हावभाव अगदी उत्तमपणे करू शकणाऱ्या कलाकाराचा शोध होता. क्रांतीला पाहिल्यावर तोच या भूमिकेसाठी योग्य असल्याची आमची सगळ्यांचा खात्री पटली. वास्तविक आयुष्यातील व्यक्ती पडद्यावर साकारणे सोपे नसते. त्यामुळेच क्रांती त्याचा अभिनय अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.क्रांती या मालिकेत बाबा रामदेव यांची भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकतो अशी बाबा रामदेव यांना खात्री आहे. ते सांगतात, क्रांती संस्कृत भाषेतील श्लोक अगदी सहजपणे म्हणतात. तसेच माझी भूमिका साकारण्यासाठी ते अनेक योगासने शिकत आहेत. प्रत्येक आसन योग्यप्रकारे यावे यासाठी ते सध्या चांगलीच मेहनत घेत आहेत. त्यांच्या या गोष्टीमुळे मी प्रचंड प्रभावित झालो आहे.क्रांती प्रकाश झाने त्याच्या कारकिर्दीत कधीच अशाप्रकारची भूमिका साकारली नाहीये. त्याने एक आव्हान म्हणून ही भूमिका स्वीकारली आहे. तो या भूमिकेविषयी सांगतो, स्वामी रामदेव यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साकारणे हे एक आव्हान आहे. एक उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी मी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे.Also Read : अजय देवगण या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पदार्पण