सृती-लीना एक त्र साजरा करणार नव्या वर्षाचा जल्लोष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 19:57 IST
नव्या वर्षांच्या स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र सुरू असताना बॉलिवूड त्यापासून दूर कसे राहणार. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारही नव्या वर्षांच्या ...
सृती-लीना एक त्र साजरा करणार नव्या वर्षाचा जल्लोष!
नव्या वर्षांच्या स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र सुरू असताना बॉलिवूड त्यापासून दूर कसे राहणार. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारही नव्या वर्षांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करीत आहे. कुमकुम भाग्य या मालिकेतील दोन अभिनेत्री सृती झा व लीना जुमानी यांनी नव्या वर्षाची खास तयारी केली आहे. या दोघी एकत्र न्यू ईअर सेलिब्रेशन करणार आहे. कुमकुम भाग्य या मालिकेत एकमेकांशी भांडण करणाºया सृती झा व लीना जुमानी याअभिनेत्री प्रत्यक्षात मात्र एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघीही नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी थांयलँडला जाण्याची तयारी करीत आहेत. या दोघींशिवाय आणखी एक व्यक्ती त्यांच्यासोबत असणार आहे. अभिनेता अरिजीत तनेजा हा देखील त्याच्या न्यू ईअर सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहे. तर थायलँडमध्ये सब्बीर अहलुवालिया आपल्या कुटुंबासोबत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयार असल्याचे सांगण्यात येते. मालिकेतील सुंत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सृती व सब्बीर आणि लीना सध्या सेटवर दिसणार नाहीत. या मालिकेतील बाकीचे कलावंत चार दिवसांचा ब्रेक घेणार असल्याचे समजते. सध्या दिव्यंका त्रीपाठी नवरा विवेक दहियासोबत हनिमूनसाठी पॅरिसमध्ये आहेत. तर करण पटेल हा देखील रित्विक धंनाजी, आशा नेगी आणि अनिता हसनंदानी सोबत अॅम्सटर्डम येथे नव्या वर्षाचे स्वाग करणार आहे. नागिन २ ची अॅक्ट्रेस मौनी राय देखील मोहित रैनासोबत गोव्यात नवे वर्ष साजरे करणार आहे. टीव्ही कलाकारांचे हे न्यू ईअर आऊटिंग बॉलिवूड कलावंतांसारखे कुठेच मागे पडू नये याची चांगलीच काळजी घेताना छोट्या पडद्यावरील कलाकार कमी नाहीत हे यावरून दिसते.