Join us  

सुरेखा पुणेकर ह्या शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 7:15 AM

झी युवा लवकरच 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ठळक मुद्दे अप्सरा आली कार्यक्रमात सुरेखा पुणेकर परीक्षकाच्या भूमिकेत

झी युवा लवकरच 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ५ डिसेंबर पासून अप्सरा आली हा कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार प्रसारित होणार आहे. 

लावणी म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजे अदाकारा व लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची कला. लावणी या लोकनृत्याची परंपरा जिवंत ठेवण्यात तसेच नवीन पिढीला या परंपरेची ओळख करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या ८व्या वर्षांपासून लावणी आत्मसात केली आणि तेव्हा पासूनच लावणी व सुरेखा पुणेकर हे दोन समानार्थी शब्द झाले. त्यांच्या कलेचे कौतुक आज सगळीकडे होत आहे. आता हीच लावणी सम्राज्ञी अप्सरा आली या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. सुरेखा पुणेकर म्हणजे लावणीचे विद्यापीठ. अप्सरा आली कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकांसाठी यांच्यासमोर समोर परफॉर्म करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. त्या स्पर्धकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना अधिकाधिक उत्तम बनवतील यात शंकाच नाही. त्यांच्या या परीक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, "मी ८ वर्षांची असल्यापासून लावणी करते आहे. मी फक्त लावणी परफॉर्म नाही करत तर या नृत्याची मी पूजा करते. मला या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्सहन द्यायला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच मी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका स्वीकारली. महाराष्ट्रातील अदाकारांची मनमोहक अदा आणित्यांची लावणी पाहायला मी खूप उत्सुक आहे ."

टॅग्स :सुरेखा पुणेकरअप्सरा आली