‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहच्या लग्नात थिरकणार सनी लिओनी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 11:36 IST
रसिकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह हिला तिच्या जीवनाचा जोडीदार मिळाला आहे. 3 ...
‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहच्या लग्नात थिरकणार सनी लिओनी?
रसिकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह हिला तिच्या जीवनाचा जोडीदार मिळाला आहे. 3 डिसेंबरला बॉयफ्रेंड आणि टीव्ही मालिका लेखक हर्ष लिंबाचियासोबत भारती रेशीमगाठीत अडकणार आहे. मात्र लग्नाबाबत भारतीचे बडे बडे प्लान्स आणि स्वप्न आहेत.भारतीचा होणारा पती हर्ष लिब्माचीया हा गुजराती आहे.त्यामुळे कमी खर्चात होणारं कोर्ट मॅरेज करावं अशी त्याची इच्छा आहे. मात्र भारतीला हे मान्य नाही. भारतीला मात्र हे लग्न धुमधडाक्यात व्हावं असं वाटत आहे. पारंपरिक पंजाबी पद्धतीने हे लग्न व्हावं. यांत हळद, मेंहदी आणि लग्न सोहळा असा तीन दिवसांच्या सा-या पारंपरिक गोष्टी असाव्यात असं भारतीचं स्वप्न आहे. इतंकच नाही तर या लग्न सोहळ्यात बड्या बड्या सेलिब्रिटींनी नाचावं अशी इच्छाही भारतीची आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि पॉर्न स्टार सनी लिओनी हिनंही आपल्या लग्नात नाचावं असं भारतीचं स्वप्न आहे. सनी लिओनी आपल्या मादक अदांमुळे बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे.सनीवर चित्रीत करण्यात आलेल्या आयटम नंबर्सना रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे वाट्टेल तितका पैसा मोजून सनीला आपल्या सिनेमात नाचवण्यासाठी निर्माते दिग्दर्शक एका पायावर तयार असतात.कोट्यवधी रुपये मानधन थिरकणारी सनी आता भारतीच्या लग्नात नाचून तिचं स्वप्न पूर्ण करणार का याकडं रसिकांच्या नजरा लागल्या आहेत.Must See:कॉमेडी क्वीन Pre- Wedding Photoshoot,दिसला रोमँटीक अंदाजआपल्या आयुष्याती सर्वात महत्त्वाचा एव्हेंट म्हणजे लग्नात सुंदर दिसावे तसेच एक नवीन लूक आणण्यासाठी नुकतेच भारतीने 10 किलो वजन कमी केले आहे. भारतीचे वजन जवळपास 85 किलो होते आणि आता तिने तिचे वजन 10 किलोने कमी केले आहे. तिचा हा नवा लूक पाहून तिला खूप सा-या चांगल्या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.तिच्या या नव्या लूकची खूप चर्चा होताना दिसतेय.आपले वजन कमी करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.