Join us  

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सुखविंदर सिंगनंतर दिसणार सुनिधी चौहान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:01 PM

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 'कुल्फीकुमार बाजेवाला' मालिकेच्या निर्मात्यांनी एका मेगा विशेष भागाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसारित होणाऱ्या विशेष भागात सुनिधी चौहान

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्लसवरील 'कुल्फीकुमार बाजेवाला' मालिकेच्या निर्मात्यांनी एका मेगा विशेष भागाचे आयोजन केले असून अनेक दिग्गज गायक-गायिकांचा समावेश असलेल्या एका भव्य संगीत जलशाचे कथानक तयार कले आहे.  मालिकेतील या संगीत जलशासाठी नामवंत पंजाबी गायक सुखविंदरसिंगची यापूर्वीच निवड करण्यात आली असून त्याने या भागाच्या प्रोमोच्या चित्रीकरणातही भाग घेतला होता. आता आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी नामवंत पार्श्वगायिका सुनिधी चौहान, नक्काश अझीझ यांची तसेच शिलाँग चेंबर कॉयरच्या गायकांना या जलशातील सेलिब्रिटी गायक म्हणून निवड केली आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसारित होणाऱ्या विशेष भागातील संगीत जलशात सिकंदरसिंग गिल (मोहित मलिक) हा गाणे गाणार असून त्याच्यासोबत हे सर्व दिग्गज कलाकारही त्याच मंचावरून गाणार आहेत. तसेच सिकंदरचा प्रतिस्पर्धी रॅपर तेवर (विशाल आदित्य सिंह) हासुद्धा या जलशात गाणे गाईल, असे सूत्रांकडून समजते आहे. सुखविंदरसिंगने मोहितबरोबर या जलशाच्या भागाच्या प्रोमोसाठी एकत्र चित्रीकरण केले होते. हा संगीत जलसा पाहणे कमालीचे ठरणार आहे.  'कुल्फीकुमार बाजेवाला' या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या कुल्फीला अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते. कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसते. 

टॅग्स :सुनिधी चौहानकुल्फी कुमार बाजेवाला