Join us  

Video :  ‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये भानुप्रियाची एन्ट्री; बघा तर नक्की कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:34 AM

Sundara Manamadhe Bharli : सोशल मीडियावर या नवीन पात्राची जोरदार चर्चा आहे. तिचं नाव भानुप्रिया.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका कलर्स वाहिनीवर सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. सध्या ही मालिका एका अनपेक्षित वळणावर आहे आणि आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. साहजिकच सोशल मीडियावर या नवीन पात्राची जोरदार चर्चा आहे. तिचं नाव भानुप्रिया.

होय, कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर भानुप्रियाच्या एन्ट्रीचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘दौलतचा अंदाज फसणार, कामवाली बाई म्हणून लतिका नव्हे तर भानुप्रिया येणार,’ अशा कॅप्शनसह हा प्रोमो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आता ही भानुप्रिया कोण? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

 

तर ती दुसरी तिसरी कुणी नसून अभिमन्यू म्हणजे लतिकाचा अभ्या आहे. होय, अभ्या हाच स्त्री वेषात भानुप्रिया बनून आली आहे. आता ती का आलीये आणि कशासाठी आलीये, हे येत्या भागात कळेलच.ही भानुप्रिया प्रेक्षकांचे लक्षवेधून घेण्यात यशस्वी होईल का हे येणार भागात समोर येईल. तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. ‘

सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील अभिमन्यू आणि लतिकाची जोडी सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. एका मुलाच्या ज्याप्रमाणे जोडीदाराबाबत अपेक्षा असतात त्याचप्रमआणे मुलीच्या देखील असूच शकतात. अभिमन्यूला त्याची जोडीदार फिट हवी होती पण काही गोष्टी घडल्या आणि अभिमन्यू - लतिका लग्नबंधनात अडकले. या प्रवासात अभिमन्यूचे लतिकाबाबतीतचे मत बदलायला हळूहळू सुरुवात झाली आणि तो तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडला, लतिका जशी आहे तशी तिला त्याने स्वीकारले. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे असते हे त्याला उमगले. मग काय त्याच्या देखील सुंदरा मनामध्ये भरली. हीच कथा ‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये दाखवण्यात येतेय.

टॅग्स :कलर्स मराठीटेलिव्हिजन