छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं(sukh mhanje nakki kay asta). ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली आणि आता तर टीआरपीच्या शर्यतीमध्येही यशस्वी घोडदौड करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या गौरी आणि जयदीप यांच्या नात्यात अनेक चढउतार येत आहेत. सध्या गौरी तुरुंगात बंद आहे. या कठीण काळात तिला जयदीपची साथ मिळणार आहे.
रिपोर्टनुसार वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गौरी आणि जयदीप पुन्हा एकत्र येणार आहेत. मानसी, गौरीला सत्य परिस्थिती सांगितली आहे. गौरीच्या हत्येचा प्रयत्न खऱ्या जयदीपने केला नसून तो अनिल होता हे सत्य गौरीला कळलं आहे. गौरी आणि जयदीपमध्ये निर्माण झालेला गैरसमज आता दूर होणार आहेत.
जयदीपला पोलिस स्टेशनमध्ये सुरुवातीला गौरीला भेटण्यासाठी पोलिस नकार देतात. पण तो आदळाआपट करुन गौरीला भेटतो.जयदीप गौरीला आता आपण गप्प बसणार नाही. त्या लोकांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय असं सांगतो. वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी अनिल आणि मानसीचा पर्दाफाश होणार आहे. त्यांचा खऱा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे इतकं दिवस त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीचं पर्दाफाश होणार आहे. अनिल आणि मानसीला काय शिक्षा मिळणार हे आपल्याला लवकरच कळेल.