Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील माई दिसणार वेगळ्या अवतारात, झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 1:40 PM

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील माई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

स्टार प्रवाह वाहिनवरील मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावते. तसेच या मालिकेतील इतर पात्रांनाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते. दरम्यान या मालिकेत माईंची भूमिका अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) निभावत आहेत. त्यांच्या माईंच्या भूमिकेनं रसिकांच्या मनात घर केले आहे. आता माई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगांवकर एका वेगळ्या अवतारात दिसणार आहेत. त्या शेर शिवराज (Sher Shivraj Movie) या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

वर्षा उसगांवकर सध्या आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पाहायला मिळत आहेत. याशिवाय त्या लवकरच रुपेरी पडद्यावर एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी बडी बेगमची भूमिका साकारली आहे. त्यांचा या चित्रपटातील लूक नुकताच समोर आला आहे. हा लूक पाहून चाहते वर्षा उसगांवकर यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

शेर शिवराज चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर पाहायला मिळणार आहे. तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत. किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. ‘गनिमीकाव्याने  खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’  चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे.

टॅग्स :वर्षा उसगांवकरदिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकर