Join us

​सुगंधा मिश्रा या कॉमेडीयनसोबत अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 12:04 IST

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर ...

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री तर ती खूपच छान करते. या मिमिक्रीसाठी तिला लता मंगेशकर यांच्याकडून देखील दाद मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली होती. या कार्यक्रमातील तिच्या परफॉर्मन्सची देखील चांगलीच चर्चा झाली होती. सुंगधा आता लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे आणि एवढेच नव्हे तर ती इंडस्ट्रीतील एक व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. द कपिल शर्मा शो मध्ये काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना संजय दत्तची मिमिक्री करणारा एक कलाकार पाहायला मिळाला होता. या कलाकाराचे नाव संकेत भोसले असून तो व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याच्यासोबत ती लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.सुगंधा संकेतच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे सुगंधाचे म्हणणे आहे. सुगंधाने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, या केवळ अफवा असून मी आणि संकेत केवळ चांगले फ्रेंड्स आहोत. आम्ही आमच्या कार्यक्रमात प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत असल्याने आम्ही खऱ्या आयुष्यात देखील नात्यात असल्याचे अनेकांना वाटत आहे. पण असे काहीही नाहीये. आम्ही केवळ एकमेकांसोबत अनेक वर्षं काम करत असल्याने एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहोत. सुगंधा आणि संकेत यांची मैत्री अतिशय जुनी आहे. संकेतला द कपिल शर्मा शोमध्येदेखील सुगंधानेच आणले होते. तो या कार्यक्रमात केवळ काहीच भाग झळकला होता. त्याची मिमिक्री लोकांना खूपच आवडली होती.