Join us  

'तेनाली रामा'मध्ये दिसणार सुमेर पसरिचा आणि ज्युनिअर मेहमूद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 7:15 AM

'तेनाली रामा' या मालिकेत तेनालीची विनोदबुद्धी आणि चातुर्याच्या कथा सांगणाऱ्या रंजक पटकथेने प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम राखली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे.

सोनी सबच्या 'तेनाली रामा' या मालिकेत तेनालीची विनोदबुद्धी आणि चातुर्याच्या कथा सांगणाऱ्या रंजक पटकथेने प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम राखली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. रामा ही प्रेक्षकांची लाडकी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कृष्णा भारद्वाजसोबत आता या मालिकेत काही नवे चेहरे दिसणार आहेत. त्यामुळे, रामा वेगवेगळ्या समस्या सोडवत असताना त्यातील मजा आणखीनच वाढणार आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवत ज्युनिअर मेहमूद म्हणून प्रसिद्ध असलेले नईम सय्यद आता मुल्ला नसिरुद्दीन या व्यक्तीरेखेसह विजयनगरमध्ये दिसणार आहेत. रामा दोन ग्रंथ पूर्ण करण्यात गुंतला आहे. अशातच मुल्ला नसिरुद्दीन त्याला ७ सात रंजक प्रश्न विचारेल. आपली बुद्धिमत्ता पटवून देण्यासाठी रामाला हे सात प्रश्न सोडवायचे आहेत.विजयनगरमधील दररोजचे तेच ते आयुष्य काहीसे अधिक गमतीशीर आणि जोमदार करण्यासाठी पम्मी अंटी म्हणून प्रसिद्ध असलेले सुमेर पसरिचाही या मालिकेत दिसणार आहेत. ते शेखचिल्लीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.आपल्या या भूमिकेबद्दल ज्युनिअर मेहमूद म्हणाले,''तेनाली रामा'चा भाग असणे ही माझ्यासाठी उत्सुकतेची बाब आहे आणि मुल्ला नसिरुद्दीनच्या व्यक्तिरेखेने माझ्यावर खरंच छाप पाडली आहे. रामाला काही कठीण प्रश्न विचारून त्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी तो घेणार आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम लाभते आहे आणि आगामी भागही त्यांच्यासाठी फारच मजेशीर ठरेल, असा मला विश्वास आहे.'शेखचिल्लीची भूमिका साकारणारे सुमेर पसरिचा म्हणाले, ''तेनाली रामा'ची पटकथा अतिशय रंजक आहे आणि त्यातील व्यक्तिरेखाही छान आहेत. त्यामुळे, या मालिकेचा भाग बनणे माझ्यासाठी अत्यंत उत्साहपूर्ण आहे. मी शेखचिल्ली म्हणून या मालिकेत आल्यानंतरची पटकथा प्रेक्षकांसाठी फारच मनोरंजक असेल.' 

टॅग्स :तेनाली रामासोनी सब