Join us  

​सारेगमप लिटिल चॅम्पसच्या सेटवर श्रीदेवीने सादर केले मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2017 7:37 AM

सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाच्या सेटवर नुकतीच श्रीदेवीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या सेटवर ती मॉम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ...

सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाच्या सेटवर नुकतीच श्रीदेवीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या सेटवर ती मॉम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. या कार्यक्रमात तिने एम्ब्रॉयडरीची साडी घातली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. श्रीदेवी रिअॅलिटी शोपासून नेहमीच दूर राहाते. तिने आपला दुसरा टिव्ही अॅपीरन्स रिअॅलिटी शोमध्ये या कार्यक्रमात पाच वर्षांनंतर दिला. श्रीदेवी सारेगमपच्या सेटवर आल्यामुळे सर्व स्पर्धकांनी श्रीदेवीच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स सादर केले. श्रीदेवीला सगळ्याच स्पर्धकांचे आवाज आवडल्यामुळे त्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. अनेक स्पर्धकांच्या आईंनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या तरुणवयात अनेक वेळा मेरे हाथो मैं नौ नौ चुडिया है या गाण्यावर नृत्य सादर केले आहे. लग्नसमारंभात तर त्यांचे हे आवडते गाणे असायचे. या गाण्याच्या अनेक आठवणी या स्पर्धकांच्या आईंनी श्रीदेवीसोबत शेअर केल्या. त्या सगळ्यांनी श्रीदेवीला नाचण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन श्रीदेवीने पुन्हा एकदा त्या गाण्याची जादू जिवंत केली. आपल्या परफॉर्मन्स आणि सिग्नेचर मुव्हसोबत तिने मेंटॉर्स, स्पर्धक आणि स्टुडिओमधील प्रेक्षकांना आठवणींच्या सफरीवर नेले. या कार्यक्रमातील मेन्टॉर नेहा कक्कर तर श्रीदेवीची मोठी चाहती आहे. ती सांगते, श्रीदेवीला नाचताना पाहाणे हे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. श्रीदेवी यांच्यासोबत ए आर रहमान यांनी देखील अतिथी सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावली. ए. आर. रहमान यांनी संगीत क्षेत्रातील काही किस्से आणि अनुभव देखील यावेळी सांगितले.