किथ सिक्वेराला भेटायला आली खास व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 16:03 IST
किथ सिक्वेराने दिया और बाती हम, तेरी मेरी लव्ह स्टोरीज, डोली अरमानो की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण ...
किथ सिक्वेराला भेटायला आली खास व्यक्ती
किथ सिक्वेराने दिया और बाती हम, तेरी मेरी लव्ह स्टोरीज, डोली अरमानो की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने बिग बॉस या कार्यक्रमाने ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमात तो त्याची प्रेयसी रोचेल रावसोबत झळकला होता. किथ आता एका नव्या मालिकेत काम करणार असून या मालिकेचे चित्रीकरण जोरात सुरू आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील किथची भूमिका खूपच वेगळी असून तो राजेशाही थाटात दिसणार आहे. तो या मालिकेत एका राजस्थानी राजपुत्राची भूमिका साकारत असून तो महाराजा माधव सिंग या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत संजीदा शेख त्याच्यासोबत काम करत आहे. ती या मालिकेत एका यशस्वी तारकेची भूमिका साकारत आहे. ती अतिशय प्रसिद्ध असली तरी तिचे पाय जमिनीवर आहेत आणि तिला सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा आहे. या मालिकेचा सेट कर्जतमध्ये उभारण्यात आला आहे. या सेटवर सध्या कलाकार आणि तंत्रज्ञ अतिशय उत्साहात चित्रीकरण करत आहेत. या मालिकेच्या सेटवर नुकताच एक पाहुणा किथला भेटायला आला होता आणि त्या पाहुण्याला पाहून किथची भंबेरी उडाली. किथ त्याच्या खोलीच्या बाहेर आला असला तिथे त्याला एक भला मोठा साप दिसला. त्याला पाहून तो स्तब्धच झाला. याविषयी किथ सांगतो, "सापाला पाहून मला प्रचंड धक्का बसला होता. माझ्या खोलीसमोरील भिंतीवर तो मला दिसला. पण नंतर तो हळूहळू करून खाली गेला. त्याचा व्हिडिओदेखील मी काढला आहे आणि माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे."