Join us  

बिग बॉस १७ मध्ये 'भाभीजी घर पर है' मधील गोरी मेमची एन्ट्री ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 6:38 PM

'बिग बॉस १७'मध्ये सौम्या टंडनची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 ‘भाभी जी घर पर है’ या टीव्ही मालिकेत ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता भाभी’ची भूमिका घरघरात लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री सौम्य टंडन हिनं साकारली होती.  या मालिकेमुळे सौम्या टंडनला प्रचंड लोकप्रियता मिळाली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सौम्याचे चाहते झाले. २०२० मध्ये सौम्यानं  मालिकेला अलविदा केलं होतं. त्यानंतर सौम्या अभिनयापासून दूर राहिली. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे.  'बिग बॉस १७'मध्ये सौम्याची  एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 सौम्याने स्वतः ती खरोखरच 'बिग बॉस'मध्ये जाणार आहे की नाही हे सांगितले. सौम्याने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत 'हे अजिबात खरं नाही' असं तिनं म्हटलं. बिग बॉस 17 चा प्रीमियर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सौम्या टंडनने तिच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांच्या दुनियेत एक स्थान मिळवले आहे. ती जवळपास 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.  तिनं ‘जोर का झटका’, ‘बोर्नविटा क्विझ’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ हे शो होस्ट केले आहेत. अनेक शो होस्ट केल्यानंतर तिने ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत काम केलं होतं. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटी