Join us

लवकरच परतणार संध्या बिंदणी,या गोष्टीमुळे घेतला होता ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 15:21 IST

दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती ...

दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय. डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी ती वर्कआऊट,डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहे. यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते.आता प्रेग्नंसीमुळे वजन वाढलं होते.त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे. दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत आहेत. त्यामुळेच ती तिचे वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाने एका मालिकेसाठी होकारही कळवला आहे. लवकरच मालिकेच्या शूटिंगला ती सुरूवात करणार असल्याचे चर्चा आहे. बाळाची नीट काळजी घेता यावी म्हणून दीपिकाने मालिकांपासून काही वर्षासाठी ब्रेक घेतला होता. 'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच 'दिया और बाती हम' या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिया और बाती या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता.मालिका बंद होवून वर्ष होवूनही रसिक संध्या बिंदनीला मात्र विसरलेले नाहीत.त्यामुळे दीपिकाला सतत ती पुन्हा छोट्या पडद्यावर कधी झळकणार असे प्रश्न विचारण्यात येत होते.यावर दीपिकानेही योग्य संधी मिळताच पुन्हा तुमच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे दीपिका पुन्हा परतणार म्हटल्यावर चाहत्यांनाही आनंदाची बातमी मिळाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.