अभिनेत्री सोनाली खरे २०१४ मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर ती ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’ या चित्रपटात झळकली. सोनाली यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करते आहे. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पून्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही. आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामूळे जणू ह्या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही ह्या शोमूळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.”
सोनाली खरे दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी करतेय टेलिव्हिजनवर कमबॅक
By तेजल गावडे | Updated: October 22, 2020 17:13 IST