Join us

​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये सोनाक्षी सिन्हाने लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 12:44 IST

इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमातील स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा प्रेक्षकांना ...

इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमातील स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिने या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. सोनाक्षी सिन्हा ही प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असून सलमानन खानने तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. सलमानच्या दबंग या चित्रपटात ती त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटानंतर तिने रावडी राठोड, हॉलिडे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आता तर सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमधील यशाचा फॉर्म्युला गवसला आहे. तिने तिच्या यशाचे हेच गुपित इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत शेअर केले. तिने स्पर्धकांना यशाचा मंत्र दिले. त्याचसोबत स्पर्धकांच्या कामगिरीचे मूल्यमापनही केले.स्टार प्लसवर इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमामुळे सामान्य लोकांना अभिनय क्षेत्रातील त्यांची अतिशय दुर्मिळ अशी स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. या कार्यक्रमाचे फॉरमॅट हे इतर रिअॅलिटी शो पेक्षा वेगळे असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या कार्यक्रमात करण जोहर आणि रोहित शेट्टी परीक्षकाची भूमिका साकारत असून ते सामान्य लोकांसाठी बॉलिवूडचे दरवाजे केवळ खुलेच करत नाहीयेत तर त्यांच्या सिनेमांमध्ये या शोमधील विजेत्यांना ब्रेकही देणार आहेत.  इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या रिअ‍ॅलिटी शो मध्ये स्पर्धकांना सुपरस्टार की पाठशाला या अकादमीत अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाते. या अकादमीत या स्पर्धकांना काही कामे करण्यास सांगितली जातात आणि त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शनही मिळते. या पाठशाळेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक अभिनयात सरस असल्याने या सगळ्यातून बाजी कोण मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या कार्यक्रमात आजवर प्रियांका चोप्रा, कंगना राणौत यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. Also Read : ​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स मध्ये स्पर्धकांना लाभणार महेश भट्ट यांचे मार्गदर्शन