Join us

अंकित जाणार ब्रेकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 11:10 IST

थपकी प्यार की या मालिकेत ध्रुवची भूमिका साकारणारा अंकित बाटला काही दिवसांच्या ब्रेकवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेत ...

थपकी प्यार की या मालिकेत ध्रुवची भूमिका साकारणारा अंकित बाटला काही दिवसांच्या ब्रेकवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेत ध्रुवची व्यक्तिरेखा घर सोडून गेली असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे काही दिवस तरी त्याला मालिकेत पाहायला मिळणार नाहीये. ध्रुवची व्यक्तिरेखा पुन्हा मालिकेत दाखवली जाणार की नाही याबाबत सध्या संभ्रम आहे. काही महिन्यांनंतर ध्रुवचा कमबॅक दाखवला जाईल अशी चर्चा आहे. ब्रेक मिळाल्यामुळे अंकितने काही दिवसांसाठी देशाबाहेर फिरायला जायचे ठरवले आहे. तसेच अंकित बाहेर पडल्यानंतर या मालिकेत काही नवीन कलाकारांची एंट्री होणार अाहे.