Join us  

सिद्धार्थ चांदेकरने अशाप्रकारे साजरा केला आईचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 4:53 PM

सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने हा वाढदिवस या मालिकेच्या सेटवर धुमधडाक्यात साजरा केला. 

ठळक मुद्देसिद्धार्थच्या आईचा ५२ वा वाढदिवस नुकताच झाला. हा वाढदिवस कायम लक्षात राहाण्यासाठी त्याने ‘जिवलगा’च्या सेटवर सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. सिद्धार्थच्या या प्लॅनमध्ये ‘जिवलगा’च्या संपूर्ण टीमने त्याला मदत केली

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत त्याने झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटातून खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. स्टार प्रवाहवर जिवलगा ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेचे जोरदार चित्रीकरण सध्या सुरू आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरसोबतच त्याची आई सीमा चांदेकर देखील मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्या आईचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने हा वाढदिवस या मालिकेच्या सेटवर धुमधडाक्यात साजरा केला. 

‘स्टार प्रवाह’वर येत्या २२ एप्रिलपासून ‘जिवलगा’ ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त होतं ते सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या वाढदिवसाचं. रिअल लाईफमधली माय-लेकाची ही जोडी रिल लाईफमध्येही आई-मुलाच्या भूमिकेत आहे. ‘जिवलगा’ या मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि त्याची आई पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत आणि विशेष म्हणजे ते दोघे आई आणि मुलाच्याच भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थसाठी ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. सिद्धार्थच्या आईचा ५२ वा वाढदिवस नुकताच झाला. हा वाढदिवस कायम लक्षात राहाण्यासाठी त्याने ‘जिवलगा’च्या सेटवर सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. सिद्धार्थच्या या प्लॅनमध्ये ‘जिवलगा’च्या संपूर्ण टीमने त्याला मदत केली आणि सेलिब्रेशनची रंगत आणखी वाढली.

सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमकडून मिळालेलं हे खास सरप्राईज पाहून सिद्धार्थची आई भारावून गेली होती. आयुष्यातले काही क्षण न विसरता येणारे असतात. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय वाढदिवस आहे. हे आनंदाचे क्षण मला दिल्याबद्दल सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमचे आभार अशी भावना सीमा चांदेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

सिद्धार्थ या मालिकेद्वारे तब्बल नऊ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'जिवलगा' ही मालिका एका आगळी-वेगळी प्रेमकथेवर भाष्य करणारी आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा…ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा…,” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. यात सिद्धार्थसोबत स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर