Join us  

 श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ, पती अभिनव कोहली पुन्हा कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 11:16 AM

जाणून घ्या काय आहे प्रकरण, श्वेताच्या पतीने का घेतली कोर्टात धाव?

ठळक मुद्देश्वेता तिवारीचे अभिनव कोहली सोबत हे दुसर लग्न आहे. मात्र या दोघांच्या नात्यात अडचणी आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी  (Shweta Tiwari) आणि तिचा पती अभिनव कोहली ( Abhinav Kohli) यांच्यातील कौटुंबिक वाद थांबण्याची चिन्ह नाहीत. आता अभिनवने पुन्हा एकदा कोर्टाचा दरवाजा ठोठावत, श्वेताचा अंतरिम जामीन रद्द व्हावा अशी मागणी केली आहे.श्वेता व अभिनव यांच्यात मुलगा रेयांशसाठी वाद सुरू आहे. श्वेता मला माझ्या मुलाला भेटू देत नाही, असा अभिनवचा आरोप आहे.  अभिनेता अभिनव कोहली मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टामध्ये केस लढत आहे. बुधवारी या केसची सुनावणी आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनव कोहलीच्या वकीलाने सांगितले की,  श्वेता तिवारी कोर्टाला न सांगता आणि परवानगी न घेता, ‘खतरों के खिलाडी’  (Khatron Ke Khiladi 11) च्या शुटींगसाठी साउथ आफ्रिकेला गेली होती. त्यामुळे आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती. आता श्वेताला याबद्दल जबाब द्यावा लागेल. श्वेता नुकतीच ‘खतरों के खिलाडी’च्या शूटींगवरून मुंबईला परतली आहे. या शोच्या शूटींगसाठी जवळपास दीड महिना ती  साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये होती. श्वेता माझ्या मुलाला एकट्याला घरी सोडून केपटाऊनमध्ये मजा मारतेय, असे म्हणत अभिनव कोहलीने धिंगाणा घातला होता. त्यानंतर श्वेता तिवारीने एक व्हिडीओ शेयर केला होता.

त्यात अभिनव सोसायटीच्या आवारात श्वेतासोबत गैरवर्तन करताना दिसला होता. यादरम्यान ती खाली पडते आणि रेयांश यामुळे प्रचंड घाबरतो, असे या व्हिडीओत दिसले होते. अर्थात नंतर श्वेताने हा व्हिडीओ डिलीट केला होता. तथापि या व्हिडीओनंतर अभिनव  सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता.श्वेता तिवारीचे अभिनव कोहली सोबत हे दुसर लग्न आहे. मात्र या दोघांच्या नात्यात अडचणी आहेत. त्यामुळे ते एकमेकांपासून विभक्त राहतात आणि मुलगा रियांशच्या कस्टडी साठी केससुद्धा लढत आहेत.

टॅग्स :श्वेता तिवारी