Join us  

Shweta Tiwari ने ट्रान्सपरन्ट ड्रेसमधील फोटो केले शेअर, बघून फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 4:59 PM

Shweta Tiwari : श्वेता तिवारीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटवरून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. श्वेताने तिचे दोन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर (Shweta Tiwari Instagram) काही नवे फोटो शेअर करून धुमाकूळ घातला आहे. नव्या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी (Shweta Tiwari)  फारच स्टनिंग दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून विश्वास ठेवणं अवघड जात आहे की, श्वेता एक २० वर्षाच्या मुलीची आई आहे.  कारण या फोटोशूटमध्ये ती स्वत: १६ ते २० वयासारखी सुंदर दिसत आहे. 

श्वेता तिवारीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटवरून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. श्वेताने तिचे दोन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्वेता सिल्व्हर बॉडीकॉन ट्रान्सपरेंट ड्रेस घालून आहे. सोबत केस तिने मोकळे सोडले आहेत. तर एक्सप्रेशन फारच मोहक दिले आहेत.

श्वेता तिवारीचा हा लूक पाहून तिचे फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहेत आणि तिच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. फॅन्स तिच्या सौंदर्याच भरभरून कौतुक करत आहेत. लोक तिच्या डिवोशनचं कौतुक करत आहे. इतकंच काय तर फॅन्स हे विचारत आहेत की, ही पलकची बहीण तर नाही ना? जी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे.

श्वेता तिवारीची मुलगी पलकही आपल्या आईच्या पावलांसवर पाउल देत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. ती लवकरच बॉलिवूडमधून डेब्यू करणार आहे. तेच तिचं आयटम सॉंग बिजली हेही रिलीज झालं आहे. 

टॅग्स :श्वेता तिवारीसोशल मीडिया