Join us  

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचे बोल्ड फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 3:19 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. पण आता श्वेता नाही तर तिची लेक पलक तिवारी हिच्या बोल्डनेसची चर्चा आहे आणि याला कारण आहे, पलकचे ताजे फोटोशूट.

ठळक मुद्देपलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. श्वेता व राजा या दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. तूर्ताय पलक आई श्वेताबरोबर राहात आहे.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. पण आता श्वेता नाही तर तिची लेक पलक तिवारी हिच्या बोल्डनेसची चर्चा आहे आणि याला कारण आहे, पलकचे ताजे फोटोशूट. पलक सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. अलीकडे पलकने नवे फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केलेत आणि बघता बघता ते व्हायरल झालेत. या फोटोत पलक ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसतेय.

८ आॅक्टोबर २००० मध्ये जन्मलेली पलक १८ वर्षांची झालीय आणि बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज आहे.‘कसोटी जिंदगी की; या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या श्वेताप्रमाणेच पलकही अशाच एका संधीच्या शोधात आहे.  

 ‘कसौटी जिंदगी की2’ मालिकेत प्रेरणाच्या भूमिकेसाठी पलक तिवारीला विचारणा झाली होती, अशी बातमी मध्यंतरी होती. खुद्द श्वेताच्या हवाल्याने मीडियाने ही बातमी दिली होती. प्रेरणाच्या भूमिकेसाठी  पलकला विचारण्यात आले. पण पलकनेच ही आॅफर धुडकावून लावली, असे सांगितले गेले होते. पुढे या बातमीवर  ‘कसौटी जिंदगी की2’ची निर्माती एकता कपूरने नाराजीही व्यक्त केली होती. एकताच्या या संतापानंतर श्वेताला असे काहीही नसल्याचा खुलासा करावा लागला होता.

त्यापूर्वी पलक  दर्शील सफारीसोबत बॉलिवूड डेब्यू करणार अशीही बातमी होती.  Quickie  हा चित्रपट दर्शीलने साईन केलाय आणि या चित्रपटासाठी फिमेल लीड म्हणून पलक तिवारीचे नाव निश्चित झाले असल्याची चर्चा रंगली होती.पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. श्वेता व राजा या दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. तूर्ताय पलक आई श्वेताबरोबर राहात आहे.

टॅग्स :श्वेता तिवारी