Join us  

अभिनेत्री श्वेता तिवारीवर लागला फसवणुकीचा आरोप, 'या' व्यक्तीने पाठवली लीगल नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 4:28 PM

आता तिच्या अ‍ॅक्टिंग स्कूलचा कर्मचारी राजेश पांडेने तिच्यावर फसवणुकीचा आरोप लावला आहे आणि तिला लीगल नोटीस पाठवली आहे. 

श्वेता तिवारी  टेलिव्हिजनवरील मोठं नाव आहे. काही सिनेमांमध्येही ती दिसली आहे. श्वेता तिवारी आपल्या सुंदरतेसोबतच आपल्या अदांसाठीही ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या समस्या श्वेताचा पिच्छा काही सोडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीने तिला मानहानीची नोटीस पाठवली होती. तर आता तिच्या अ‍ॅक्टिंग स्कूलचा कर्मचारी राजेश पांडेने तिच्यावर फसवणुकीचा आरोप लावला आहे आणि तिला लीगल नोटीस पाठवली आहे. 

श्वेताने मुंबईमध्ये एक अ‍ॅक्टिंग स्कूल सुरू केलं होतं ज्याचं नाव ‘Shweta Tiwari’s Creative School of Acting’ असं होतं. राजेश पांडे या स्कूलमध्ये अ‍ॅक्टिंग टीचर होते. आजतकसोबत बोलताना राजेश पांडेने सांगितले की, ‘मी श्वेता तिवारीच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये २०१२ पासून शिक्षकाचं काम करत होतो. पण तिने माझा डिसेंबर २०१८ पासूनचा पगारच दिला नाही आणि कधी माझा TDS जमा केला नाही. मी श्वेताच्या तिवारी स्कूलमध्ये इतकी वर्षे काम केलं. या बदल्यात मला काय मिळालं. फसवणूक'.

राजेश पांडेने पुढे सांगितले की, 'मी फार हैराण आहे. कारण श्वेता तिवारीने माझे पैसे देणं तर दूरच माझे फोन उचलणंही बंद केलंय. दुसरीकडे कोरोनामुळे माझ्या अजिबात पैसे नाहीत आणि माझा घरमालक मला भाड्यासाठी त्रास देत आहे'. राजेश पांडेने लावलेल्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी श्वेता तिवारीला फोन लावण्यात आला पण तिने उत्तर दिलं नाही.

राजेश पांडेबाबत बोलण्यासाठी श्वेता तिवारीचे पती अभिनव कोहली तयार झाला. त्याने आजतकला सांगितले की, 'हे खरं आहे की, श्वेता तिवारीने राजेश पांडेचे ५० हजार रूपये दिले नाहीत. त्याला पर्सनली ओळखतो सुद्धा आणि मला वाईटही वाटतंय. दोन वर्षांपासून राजेश श्वेतासमोर पैशांसाठी हात पसरवतोय. ती पैसे द्यायला तयार नाही. पण राजेशकडे सगळे पुरावे आहे की, तिने त्याचे पैसे दिले नाहीत. 

टॅग्स :श्वेता तिवारीटेलिव्हिजन