Join us  

चुलीवर जेवण बनवताना दिसली 'अंगुरी भाभी', फोटो बघताच चाहत्यांनी विचारायला सुरूवात केले असे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 6:00 AM

अंगुरी भाभी या भूमिकेमुळे शुभांगी अत्रे आज प्रसिद्ध आहे. कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. हीच बाब शुभांगीबद्दल तुम्हाला जाणवेल तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्ही नजर टाकली तर अभिनयाव्यतिरिक्तही शुभांगी वेगवेगळ्या गोष्टी करत स्वतःला बिझी ठेवते.

छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं पात्र म्हणजे अंगुरी भाभी. अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे.या भूमिकेतून शुभांगी अत्रे यांनी  रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे. अंगुरी भाभी या भूमिकेमुळे  शुभांगी अत्रे आज प्रसिद्ध आहे. कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. हीच बाब शुभांगीबद्दल तुम्हाला जाणवेल तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्ही नजर टाकली तर अभिनयाव्यतिरिक्तही शुभांगी वेगवेगळ्या गोष्टी करत स्वतःला बिझी ठेवते. सध्या तिच्या एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

या फोटोत ती चक्क चुल्हीवर जेवण बनवतानाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. चुलीवरच जेवणाची मजा काही औरच असे म्हणत तिने आपला हा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.मुळात शुभांगीला  कुकिंगची आवड आहे. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते खाऊ घालणे हा त्यांचा एक आवडता छंदच. बिझी शेड्युअलमधून वेळ मिळताच शुभांगी अशाच वेगवेगळ्या ठिकाणांची चविष्ट पदार्थांवर ताव मारतानाही दिसते. तुर्तास तिचा हा फोटो पाहून चाहतेही तिची वाहवा करताना पाहायला मिळत आहेत. 

शुभांगी अत्रेला बिग बॉसच्या चौदाव्या सीझनसाठी विचारण्यात आले होते. याबाबत तिने सांगितले की, हो हे खरं आहे की मला बिग बॉस 14साठी कॉल आला होता. पण आता मी भाभीजी घर पर है या मालिकेत काम करते आहे आणि माझे सर्वात पहिलं प्राधान्य मालिका आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे ती म्हणाली की, बिग बॉससारखा शो माझ्यासाठी नाही कारण जो कंटेट लोकांना आवडतो तो मी देऊ शकणार नाही. भांडण वगैरे मला जमत नाही पण पुढचं मला माहित नाही. कदाचित भविष्यात माझं मत बदलेल आणि मी बिग बॉसचा हिस्सा बनेन.

मला टीव्हीवर दिसण्याआधी मुलीचा विचार करावा लागतो. आई असल्याच्या नात्याने मला माझ्या मुलीची देखील काळजी घ्यावी लागते. मला विचार करावा लागतो की ती मला टीव्हीवर कसे पाहते आणि त्यात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते ते माझ्या मुलीने पाहू नये असे मला वाटते. बिग बॉस माझा फेव्हरिट शो आहे.

शुभांगी अत्रे प्रसिद्ध बॉक्सिंगपटू मेरी कॉमची चाहती आहे. शुभांगी अत्रे मेरी कॉमची इतकी मोठी चाहती आहेत की  तिला आता मेरी कॉमची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. री कॉमचे कौतुक करत त्यांनी भाभीजी घर पर है मालिकेच्या निर्मात्यांना मेरी कॉमच्या जीवनावर एक शो बनवण्याची विनंती केली होती.

टॅग्स :भाभीजी घर पर है