Join us

​Shocking! कसोटी जिंदगी की या मालिकेसाठी रोनित रॉयला मिळायचे एवढे कमी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 14:23 IST

कसोटी जिंदगी की या मालिकेतील ऋषभ बजाज या व्यक्तिरेखेमुळे रोनित रॉयला एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेत काम करण्याच्याआधी ...

कसोटी जिंदगी की या मालिकेतील ऋषभ बजाज या व्यक्तिरेखेमुळे रोनित रॉयला एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेत काम करण्याच्याआधी त्याने जान तेरे नाम, सैनिक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पण रोनितला चित्रपटांमध्ये यश मिळवता आले नाही.  रोनित रॉयला अभिनयात अपयश मिळाल्यामुळे तो खूपच दुःखी होता आणि त्याच काळात त्याच्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला. वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींमुळे तो दारुच्या अधीन गेला होता. पण कसोटी जिंदगी की या मालिकेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले. कसोटी जिंदगी की या मालिकेतील ऋषभ बजाज ही त्याची भूमिका केवळ आठ आठवड्यांची असणार असे ठरले होते. पण रोनित रॉयने त्याच्या दमदार अभिनयाने ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे सादर केली. अल्पावधीतच या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यामुळे या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूरने ऋषभ बजाज ही भूमिका मालिकेत कायम ठेवण्याचे ठरवले.कसोटी जिंदगी की या मालिकेसाठी रोनित रॉयला सुरुवातीला किती पैसे मिळत होते हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. रोनित रॉयला या भूमिकेसाठी दिवसाला केवळ 250 रुपये मिळत असत. पण त्या काळात त्याच्यासाठी ही मोठी रक्कम होती. त्यामुळे त्याने या मालिकेत काम करण्यास होकार दिला होता. कसोटी जिंदगी की या मालिकेत अनेक वर्षं रोनितने ऋषभ ही भूमिका साकारली. ही मालिका संपेपर्यंत रोनितला एका दिवसांचे एका लाखाहून अधिक पैसे मिळायला लागले होते. कसोटी जिंदगी या मालिकेने रोनित रॉयच्या करियरला एक वेगळी दिशा दिली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आज रोनित छोट्या पडद्यावरचा सर्वात यशस्वी आणि सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे.रोनितने केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही आपले प्रस्थ निर्माण केले आहे. सरकार 3, उडाण, काबिल, टू स्टेटस यांसारख्या चित्रपटात त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.