Join us  

'तारक मेहता' फेम दयाबेननेही केले आहे बी-ग्रेड सिनेमात काम, फोटो पाहून तुम्हालाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 12:23 PM

बघता -बघता दया बेन ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरू लागली. डायलॉग बोलण्याची स्टाइल आणि त्याचबरोबर तिने हाव-भाव खूप लोकप्रिय झाले. आज तिचे डॉयलॉगही खूप फेमस आहेत.

2017 मध्ये ती 'तारक मेहता…' मधून ब्रेक घेत तिच्या खासगी आयुष्यात ती रमली. दया बेन मालिकेत कधी परतणार यावर अद्याप तरी प्रश्न चिन्हच आहेत. तसेच या शोमध्ये ती परत येईल अशी कोणत्याही प्रकारची शाश्वती देखीन नसल्याचे मालिकेच्या टीमनेच स्पष्ट केले होते. दिशाला खरी ओळख तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमुळेच मिळाली. याच मालिकेमुळे ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. आज रसिक तिला दया बेन म्हणून ओळखत असले तरी मालिकेत एंट्री करण्यापूर्वी तिने रूपेरी पडद्यावरही काम केले आहे.

दिशाने आपल्या कारकीर्दीत 1-2 नव्हे तर चक्क 9 सिनेमात काम केले आहे.सिनेमात काम केले असले तरी फारसे तिचे काम लोकांना माहितीच नाहीत. सिनेमात काम करताना तिच्या वाट्याला हव्या तशा भूमिका आल्या नाहीत. तसेच कामाची सुरूवात करावी. काम मिळावे म्हणून येईल त्या ऑफर्स दिशाने सुरूवातीच्या काळात स्विकारल्या. म्हणून दिशाला सुरूवातील बी-ग्रेड सिनेमात काम करावे लागले. 

1997 मध्ये दिशाला तिचा पहिला सिनेमा मिळाला.  'कामसिन - द अनटच' हा सिनेमा कधी आणि कधी गेला हे कोणालाच कळले नाही. त्यानंतरही दिशाने सिनेमात काम करणे सुरूच ठेवले. १९९९ मध्ये  ‘फूल और आग’ सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली . सिनेमात मिथुन, जैकी श्रॉफ, हरीश आणि अरुणा ईरानीसारखे  नावाजलेले कलाकार होते. या सिनेमात ही दिशाची भूमिका असूनही नसल्यासारखीच होती. आज नाही तर उद्या चांगल्या सिनेमाच्या ऑफर्स मिळतील म्हणून तिने येईल त्या सिनेमाच्या ऑफर्स स्विकारल्या. आमिर-शाहरुख-ऋतिकसोबतही तिने काम केले आहे.

२००८ हे वर्ष दयाासाठी थोड्याफार प्रमाणात चांगले ठरले. या वर्षात तिने  ‘जोधा अकबर’, ‘सी के कंपनी’ आणि ‘लव स्टोरी 2050’ सारखे सिनेमात काम केले. इतकेच नाही तर  सिनेमात साईड एक्टरची भूमिका साकारणारी दिशाला तारक मेहता मालिकेत मुख्य भूमिका मिळाली ख-या अर्थाने ते वर्ष तिच्यासाठी लकी ठरले. बघता -बघता  दया बेन ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरू लागली. डायलॉग बोलण्याची स्टाइल आणि  त्याचबरोबर तिने हाव-भाव खूप लोकप्रिय झाले. आज तिचे डॉयलॉगही खूप फेमस आहेत.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी