Join us

Shocking : बिग बॉसची एक्स स्पर्धक असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा केला विनयभंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 20:01 IST

बिग बॉस या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोची एक्स स्पर्धक आणि स्टार प्लसवरील ‘हर शाख पर उल्लू बैठा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण ...

बिग बॉस या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोची एक्स स्पर्धक आणि स्टार प्लसवरील ‘हर शाख पर उल्लू बैठा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा शर्मा हिने सनदी लेखापालविरोधात छेडछाडीचा आरोप केला आहे. रिपोर्ट्सनुसार श्रद्धाने सीए राजेश सलूजावर आरोप करताना म्हटले की, ‘तो मला अश्लील मॅसेजेस पाठवित होता. त्याचबरोबर मुला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता. श्रद्धाने म्हटले की, मी त्याच्या मॅसेजकडे बºयाचदा दुर्लक्ष केले. मात्र अशातही तो सातत्याने मला मॅसेजेस पाठवित होता. त्याने बºयाचदा मला यावरून धमकीही दिली आहे. मला नेहमीच कुठल्या कुठल्या बहाण्याने आॅफिसमध्ये बोलावित होता. माझ्याशी नेहमीच अश्लील बोलण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा मी त्याच्यात रस दाखविला नाही, तेव्हा त्याने एक दिवस मला धक्का मारला होता. यावेळी त्याने माझे ब्रेस्टवर हातही लावला होता. या संपूर्ण घटनेनंतर मी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, श्रद्धाने याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजेश मला म्हणायचा की, जर मी त्याचे ऐकले नाही तर तो मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून लव लेटर्स पाठविण्यास सुरुवात करणार. तो मला धमकी देऊन माझे शोषण करण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, श्रद्धा बिग बॉसच्या सीजन ५ मध्ये सहभागी झाली होती. सध्या ती छोट्या पडद्यावर नशीब आजमावित आहे.