Join us  

पाठदुखीतही अनुष्का शर्माने केले इंडियन आयडलसाठी चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 4:16 PM

सध्या अनुष्काला पाठदुखीचा खूप त्रास होत आहे. तिला इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील खूप वेदना होत होत्या. पण तरीही तिने या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले.

आपण अशा अनेक गोष्टी ऐकतो की, आपले पॅशन आणि आपल्या आवडत्या गोष्टींसाठी बॉलिवूड अभिनेते कोणत्याही टोकाला जातात. भारतातील सर्वात मोठा गायन रिअॅलिटी शो, इंडियन आयडलच्या सेटवर अशाच प्रकारची एक घटना घडली. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच वरुण धवनसोबत सेटवर आली होती. आपल्या सुई धागा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. सध्या अनुष्काला पाठदुखीचा खूप त्रास होत आहे. तिला या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील खूप वेदना होत होत्या. पण तरीही तिने या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले. स्पर्धकांची गाणी ऐकून ती खूप प्रभावित झाली आणि तिने त्यांना स्टँडिंग ओव्हेशन देखील दिले.

सर्वोत्तम ११ स्पर्धकांच्या गाण्यांनी रंगलेली ही मैफल या वीकएंडला पाहण्यासारखी असणार आहे. अवंती पटेलने अनुष्का शर्माचे गीत ‘गर्ल्स लाइक टू स्विंग’ अप्रतिमरित्या सादर केले आणि त्यामुळे सेटवरील वातावरण पार बदलून गेले. अनुष्का शर्माला खूप वेदना होत असून देखील तिला नाचण्याची इच्छा होत होती आणि तेव्हाच वरुण धवन आणि विशाल दादलानी पुढे सरसावले. ते दोघे मंचावर गेले आणि अनुष्का शर्माभोवती नाचू लागले. अनुष्काने देखील मजेत टाळ्या वाजवल्या. अनुष्काने आपली वेदना विसरून सर्व परफॉर्मन्सेसचा भरभरून आनंद लुटला. अवंती पटेल सोबत इतर स्पर्धकांनी देखील आपल्या वेधक परफॉर्मन्सने या सुंदर अभिनेत्रीला प्रभावित केले.

सेटवरील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “अनुष्काने वरुणला सेटवर नृत्य करण्याची विनंती केली. वरुणने परीक्षक विशाल दादलानी आणि सूत्रसंचालक मनीष पॉल यांच्यासोबत एका प्रसिद्ध गीतावर अप्रतिम नृत्य सादर केले. या तिघांनी अनुष्का भोवती नृत्य सादर केले आणि मग या नृत्यात सर्व स्पर्धक देखील उत्साहाने सामील झाले. प्रचंड पाठदुखी असताना देखील अनुष्का शर्मा कार्यक्रमास आवर्जून आली हे पाहून सर्व जण अवाक् झाले होते. अवंती पटेलचा परफॉर्मन्स पाहून तर ती खूप खुश झाली होती आणि इतर स्पर्धकांना तिने चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.”

टॅग्स :इंडियन आयडॉलअनुष्का शर्मावरूण धवनसुई-धागा