Join us

'इस प्यार को क्या नाम दू'मध्ये शिवानी तोमरचा एथनिक लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 10:24 IST

'इस प्यार को क्या नाम दू' ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर येणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. आपल्या आवडत्या ...

'इस प्यार को क्या नाम दू' ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर येणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. आपल्या आवडत्या हार्टथ्रॉब बरूण सोबतीला स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.पहिल्या दोन सीझन्सच्या भव्य यशानंतर ह्या सीझनमध्ये बरूण शिवानी तोमरसोबत प्रणय करताना दिसून येईल. ह्या शोमध्ये शिवानीची व्यक्तिरेखा अलाहाबाद ह्या पवित्र शहरामध्ये जन्म आणि लहानाची मोठी झाली आहे. ती ज्ञानी असून तिला भगवद्‌गीता पाठ आहे. हेच लक्षात घेऊन ह्या शोमधील तिचा लूक तिच्या व्यक्तिरेखेला साजेसा बनवण्यात आला आहे. ती ह्या शोमध्ये सुती लेहेंगा आणि साड्‌यांमध्ये, ऑक्सिडाईज्ड दागिने आणि नैसर्गिक मेकअपमध्ये दिसून येईल. खास ह्या भूमिकेसाठी तिने आपले नाकही टोचून घेतले आहे आणि तिचा एकूणच लूक एथनिक आहे.चांदनी ही व्यक्तिरेखा सध्या टीव्हीवर दिसून येणाऱ्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळी असून आपली व्यक्तिरेखा आणि लूकबद्दल शिवानी म्हणाली, “माझा लूक माझ्या व्यक्तिरेखेला अगदी साजेसा आहे. ती एक साधी मुलगी आहे आणि त्याचप्रमाणे तिचे कपडे आणि मेकअपही. मला हा लूक खूप आवडला आहे आणि मला खात्री आहे की माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल कारण ही भूमिका टीव्हीवरील व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळी आहे. माझी व्यक्तिरेखा लग्नाच्या आधीपासून साडी नेसताना दिसेल. चांदनी ह्या माझ्या व्यक्तिरेखेचा योग्य लूक मिळवण्यासाठी खूप बारकाईने काम करण्यात आले आहे.”